Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 9
  सातारा शहराच्या शाहूपुरी परिसरातल्या अंबेदरे रस्त्यात गौरव माने या 20 वर्षाच्या युवकावर भेदरलेल्या बिबट्याने झडप घातल्याच्या घटनेने, शहराच्या परिसरात दहशत निर्माण झाली. गेल्या काही महिन्यात अजिंक्यतारा, कास पठाराच्या भागात समाजकंटकांनी डोंगरात वणवे लावायचा विघ्नसंतोषी उद्योग सुरू केला. या वणव्याने गवत तर जळालेच पण नव्याने लावलेली झाडांची रोपटी, दोन चार वर्षे जगलेली झाडे, पक्ष्यांची घरटीही जळून भस्मसात झाली. तीन दिवसांपूर्वी सायंकाळी अशाच काही विघ्नसंतोषी लोकांनी यवतेश्‍वरच्या डोंगरात वणवा लावला. त्या भागातच हा बिबट्या फिरत असावा. अचानक लागलेल्या आगीने घाबरलेला, भेदरलेला बिबट्या डोंगर उतरून अंबेदरेच्या रस्त्यावर आला असावा. जंगल हे बिबट्या, रानडुकरे आणि अन्य प्राण्यांचे हक्काचे-सुरक्षित आश्रयस्थान! पूर्वी जंगले घनदाट असल्याने वाघ, बिबट्यांचे अन्न असलेली हरणे आणि अन्य प्राणीही विपुल प्रमाणात होते. तृणभक्षक प्राण्यांना गवत, पक्ष्यांना फळे, अळ्या असे अन्न आणि मांसभक्षक प्राण्यांनाही त्यांची शिकार सहजपणे मिळत असे. गेल्या चाळीस वर्षात विकासाच्या गोंडस नावाखाली जंगलांच्या कत्तली झाल्या.
Friday, February 23, 2018 AT 08:49 PM (IST)
  विदर्भ-मराठवाड्यात नुकत्याच झालेल्या गारपिटीच्या तडाख्यात तीन लाख हेक्टर क्षेत्रातील गहू, ज्वारी, संत्री, आंबा, हरभरा, कापूस, अशी पिके जमीनदोस्त झाली. शेतकर्‍यांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले. लिंबाएवढ्या आकाराच्या मोठ्या गारांचा वर्षाव झाल्यामुळे, पोपट, चिमण्या, कावळे, बगळे, असे हजारो पक्षीही गारपिटीने मृत्युमुखी पडले. शेतकर्‍यांनी पाळलेल्या हजारो कोंबड्या गारपिटीच्या मार्‍याने दगावल्या. काही जनावरांचेही मृत्यू झाले. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना सरकारने नुकसान भरपाई जाहीर करून दिलासा दिला. गारपिटीने मेलेल्या कोंबड्या आणि जनावरांचे पंचनामे झाल्यावर, या आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांनाही नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्‍वासन सरकारने दिले. गारपिटीने मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्या आणि जनावरांचे पंचनामे करायचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी पशुसंवर्धन खाते आणि तलाठ्यांना दिले आहेत. पण पशुसंवर्धन खात्याच्या अधिकार्‍यांनी आणि काही तलाठ्यांनी गारपिटीने मेलेल्या कोंबड्या शवविच्छेदनासाठी सरकारी जनावरांच्या दवाखान्यात घेऊन याव्यात, असे फर्मान शेतकर्‍यांना काढल्याने, शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Wednesday, February 21, 2018 AT 08:46 PM (IST)
  पंचवीस वर्षांपूर्वी पुणे-मुंबई या खंडाळा घाटातून जाणार्‍या जुन्या रस्त्यावरून प्रवास करायसाठी वाहनांना सरासरी चार ते पाच तास लागत असत. खंडाळा घाटात एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यास, वाहतुकीची कोंडी तर सातत्याने होत असे. या कोंडीत दोन्ही बाजूला अडकलेल्या वाहनांना रस्त्यातच, अपघाती वाहनाचा अडथळा दूर होईपर्यंत काही वेळा दहा-पंधरा तासही अडकून पडावे लागे. अनेक वेळा हजारो वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूला लागत. वाहतुकीची झालेली ही कोंडी फुटायला खूपच वेळ लागत असे. लोणावळा ते खोपोली या जुन्या पुणे-मुंबई खंडाळा घाटातल्या रस्त्याने वाहने चालवणेही, अतिवळणामुळे धोकादायक होते. 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यावर पुणे-मुंबई या नव्या द्रूतगती मार्गाच्या विकासाला मंजुरी देण्यात आली आणि हा चौपदरी नवा रस्ता अवघ्या चार वर्षात बांधून पूर्णही झाला. या द्रूतगती मार्गावर वळणेही नसल्याने, पुणे-मुंबई हा प्रवास पूर्वीपेक्षा निम्म्या वेळात आणि तोही अडथळ्याशिवाय करणे सुलभ झाले.
Tuesday, February 20, 2018 AT 08:43 PM (IST)
  भारतीय समाजात 40-50 वर्षापूर्वी युवक-युवतींनी खुलेपणाने परस्परांशी बोलणेही अवघड होते. शाळा-महाविद्यालयात तर विद्यार्थी-विद्यार्थिनी परस्परांशी  बोलायचे धाडसही करीत नसत. सख्याहरींच्या टोळक्यांनी चौकात उभे राहून, युवतींची छेड-छाड, शिट्या मारायच्या, सुंदर युवतीचे लक्ष वेधत युवकच डोळे मारत. परस्परांवरचे प्रेमही अव्यक्त राहात असे. चोरून परस्परांना  प्रेमपत्र लिहिणे आणि दोघांच्याही परिचयातल्या मित्र-मैत्रिणीकडून अशा चिठ्ठ्यांची देवाणघेवाण तीही गुपचूपच होत असे. चोरून प्रेम करायचा तो जमाना अलीकडे संपला. मुक्त आणि उदारमतवादी पाश्‍चात्य संस्कृती देशाच्या शहरी-ग्रामीण भागापर्यंत रुजली-बोकाळली. ‘खुल्लम खुल्ला’ प्रेमाचा जमाना सुरू झाला. स्मार्टफोनच्या नव्या सुविधेने तर व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकद्वारे प्रेमपत्रच काय, पण परस्परांच्या छब्यांचीही देवाणघेवाण व्हायला लागली. शाळेतल्या कोवळ्या वयातल्या मुला-मुलींच्यापर्यंत ‘प्रेमरोगा’चा झपाट्याने प्रसार झाला. शाळा, महाविद्यालयात प्रेमिकांच्या प्रेमाला बहर यायला लागला. मुली-युवतीच प्रेमाच्या प्रकरणात आक्रमक व्हायला लागल्या.
Thursday, February 15, 2018 AT 08:52 PM (IST)
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू मित्र आणि सल्लागार. फडणवीस यांनी मैत्रीला जागूनच, मुख्यमंत्री होताच चंद्रकांत दादांना आधी मंत्री केले आणि नंतर एकनाथ खडसे यांनी महसूलमंत्रिपद सोडल्यावर ते खाते चंद्रकांत दादांच्याकडे दिले. मंत्रिमंडळातले दुसर्‍या क्रमांकाचे हे खाते. राज्याचा महसूल कसा वाढवायचा, यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणतानाही चंद्रकांत दादांना आपल्या भारतीय जनता पक्षाचा मतांचा महसूलही वाढवायची काळजी घ्यावी लागते आहे. ते महाराष्ट्राचे महसूल मंत्री असले, तरी आपल्या लाडक्या कोल्हापूर जिल्ह्याला ते वारंवार भेटी देतात. पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटतात. कधी कर्नाटकातल्या जाहीर समारंभात कर्नाटकचे गीत गातात, या राज्यात जन्मायला यायला भाग्य लागते, अशी इच्छाही व्यक्त करतात. त्यांच्या या कर्नाटकातल्या सभेतल्या भाषणाने वादळही उठले. पण, या असल्या वादळाला घाबरेल तर तो भुदरगडचा पाटील कसला? छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुदरगड किल्ल्याच्या परिसरात झालेल्या युद्धसंघर्षामुळेच, त्यांना शब्दांचे दांडपट्टेही  चांगलेच चालवता येतात.
Tuesday, February 13, 2018 AT 08:41 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: