Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 35
5विशाखापट्टणम, दि. 6 (वृत्तसंस्था) : भारताने कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्‍या डावात मोहम्मद शमी (5/35) आणि रवींद्र जडेजा (4/87) यांनी सर्वाधिक बळी मिळवत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्याच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 9 बळींची आवश्यकता होती. लय सापडलेल्या टीम इंडियाने दिवसाच्या दोन सत्रांमध्येच हा विजय आपल्या नावे केला. दिवसाच्या पहिल्याच सत्रात मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांच्या घातक फिरकी गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेचे 7 फलंदाज एक मागोमाग एक तंबूत धाडले. विजयासाठी केवळ दोनच बळी आवश्यक असताना भारताने दुसर्‍या सत्रात 22 षटके फेकत या सामन्यावर आपले नाव कोरले. या सामन्यात 8 बळी मिळवणारा रविचंद्रन अश्‍विनने सर्वात जलद बळी मिळवण्याच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी साधली. यापूर्वी शनिवारी भारताने आपल्या दुसर्‍या डावात रोहित शर्माच्या (127) दमदार शतकाच्या जोरावर 323/4 च्या धावसंख्येवर आपला डाव घोषित केला होता.
Monday, October 07, 2019 AT 08:56 PM (IST)
टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया अमेरिकेत 5फ्लोरीडा, दि. 1 (वृत्तसंस्था) ःविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 3 ऑगस्टपासून भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा सुरु होणार आहे. या दौर्‍यात भारत 3 टी-20, 3 वन-डे आणि 2 कसोटी सामने खेळेल. पहिले 2 टी-20 सामने हे अमेरिकेतल्या मियामी शहरात खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला आहे. विश्‍वचषकातून आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता भारतीय संघाच्या विंडीज दौर्‍यातील कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष असणार आहे.
Friday, August 02, 2019 AT 09:04 PM (IST)
5नवी  दिल्ली, दि. 28 (वृत्तसंस्था) : विश्‍वचषकातील आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ आता आपल्या आगामी दौर्‍यासाठी सज्ज झाला आहे. 3 ऑगस्टपासून भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौर्‍याला सुरुवात होणार आहे. या दौर्‍यात भारतीय संघ 3 टी-20, 5 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. मात्र नवीन दौर्‍यापूर्वीही भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार हा प्रश्‍न सुटलेला नाही. विश्‍वचषक स्पर्धेत फलंदाजीच्या क्रमावरुन मोठे रामायण घडले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला त्याचा फटकाही बसला. मात्र महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय संघात जागा मिळालेल्या यष्टीरक्षक ऋषभ पंतने आपण चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते. माझ्यासाठी ही गोष्ट नवीन नाहीये. यापूर्वीही मी आयपीएमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलो आहे. मी या जागेसाठी सरावही करत आहे. मी कोणत्याही एका शैलीत खेळत नाही. सामन्याची गरज असेल तसे खेळण्याचा माझा प्रयत्न असतो. लोक माझ्याबद्दल काय म्हणतात याचा मला काहीही फरक पडत नाही. मी वर्तमानपत्र फारसे वाचत नाही.
Monday, July 29, 2019 AT 09:02 PM (IST)
5इंडोनेशिया, दि. 28 (वृत्तसंस्था) : इंडोनेशियातील लाबुआन भागात सुरु असलेल्या मानाच्या झीशीळवशपीं र्उीि स्पर्धेत भारताची सर्वोत्कृष्ट महिला बॉक्सर मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 51 किलो वजनी गटात मेरी कोमने आपल्या ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्धी एप्रिल फ्रेंक्सचा 5-0 च्या फरकाने पराभव केला. आगामी ऑलिम्पिक स्पर्धा लक्षात घेता, मेरी कोमने ठराविक स्पर्धांमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही मेरी सहभागी झाली नव्हती. मात्र 21 सप्टेंबरपासून सुरु होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेआधी सराव म्हणून मेरी कोमने झीशीळवशपीं र्उीि स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला, आणि आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मेरीने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
Monday, July 29, 2019 AT 09:01 PM (IST)
5जकार्ता, दि. 21 (वृत्तसेवा) : भारताची अग्रनामांकित बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिचे इंडोनेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेचे सुवर्ण पदक हुकले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिला जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव स्वीकारावा लागला. यामागुचीने सिंधूचा 15-21, 16-21, असा पराभव केला. सिंधूने हा मुकाबला अवघ्या 51 मिनिटांमध्ये गमावला. जगातील क्रमांक 4 ची बॅडमिंटनपटू यामागुचा बीडब्ल्यूएफ दौर्‍यात सिंधू विरुद्धचा हा पाचवा विजय आहे. यापूर्वी दोघी 14 वेळा आमनेसामने आल्या. यात सिंधू 10-4 अशी आघाडीवर होती. मुकाबल्याच्या सुरुवातीला सिंधूने आक्रमकपणा दाखवत लढतीवर आपली हुकुमत राखली. मात्र, नंतर ती यामागुचीच्या स्मॅशना उत्तर देऊ शकली नाही. यामागुचीने फोरहँड स्मॅशद्वारे ही लढत आपल्या बाजूने वळवली. सिंधूने काही चुकाही केल्या. शिवाय आघाडी मिळवण्याच्या अनेक संधीही गमावल्या. आपल्या आक्रमक खेळाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचून पुन्हा एकदा सिंधूच्या हातून हा विजय निसटला.
Monday, July 22, 2019 AT 08:44 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: