Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 60
मुंबईसह राज्यातल्या 27 महानगरपालिकांच्या हजारो नगरसेवकांच्या मासिक मानधनात तब्बल अडीचपटीने वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने, जनसेवेत गर्क असलेले नगरसेवक खूश होतील. गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. 2008 मध्ये मुंबई महापालिकेच्या आणि 2010 मध्ये अन्य महापालिकांच्या नगरसेवकांच्या मानधनात वाढ झाली. पण, गेल्या सात वर्षात मात्र हे नगरसेवक मानधनाच्या वाढीपासून वंचित राहिले होते. आता मात्र जनहित आणि महापालिकांच्या विकासासाठी प्रयत्नशील लोकहिताचा अपार कळवळा असलेल्या नगरसेवकांच्या मानधनात भरघोस वाढ करून, त्यांच्या जनसेवेची गांभीर्याने दखल घेतली आहे. या निर्णयानुसार ‘अ+’ वर्ग असलेल्या मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना दरमहा 25 हजार रुपये, तर पुणे, नागपूर या ‘अ’ वर्गातल्या महापालिकांच्या नगरसेवकांना दरमहा 20 हजार रुपये आणि पिंपरी-चिंचवड, ठाणे, नाशिक, कल्याण, वसई, नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकांच्या नगरसेवकांना दरमहा 15 हजार रुपये आणि ‘क’ आणि ‘ड’ वर्ग महापालिकांच्या नगरसेवकांना दरमहा 10 हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे.
Monday, July 17, 2017 AT 09:02 PM (IST)
अमरनाथच्या पवित्र गुहेतल्या श्री शंकराचे दर्शन घेऊन अनंतनागहून जम्मूकडे जाणार्‍या यात्रेकरूंच्या बसवर सोमवारी रात्री नरपशू दहशतवाद्यांनी हल्ला चढवून 7 भाविकांचे केलेले हत्याकांड, म्हणजे माणूसकीचाही मुडदा पाडणारे भयानक कृत्य होय. गेली काही वर्षे अमरनाथच्या यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे भीषण सावट असले, तरीही लष्कर, सीमा सुरक्षादल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे ही यात्रा शांततेत पार पडत होती. 1 ऑगस्ट 2000 या काळ्या दिवशी पेहलगामच्या अमरनाथ श्राईन बोर्डाच्या यात्रेकरूंच्या मुख्य तळावर दहशतवाद्यांनी अचानक चढवलेल्या हल्ल्यात 45 भाविकांचे मृत्यू झाले होते. त्या घटनेची जगभर निंदाही झाली होती. पण या घटनेनंतर मात्र अमरनाथ यात्रेवर भ्याड हल्ला चढवायचे धाडस सैतानी आणि विकृतीने पछाडलेल्या दहशतवाद्यांना झाले नव्हते. पण, सोमवारी रात्री मात्र त्यांना सुरक्षा व्यवस्थेतल्या चुकीमुळे भाविकांच्या बसवर हल्ला चढवायची संधी मिळाली. अमरनाथाचे दर्शन घेऊन वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन पुढे जम्मूला जायसाठी 56 यात्रेकरूंना घेऊन ही बस अनंतनागहून निघाली, ती सुरक्षा व्यवस्थेचा भंग करून.
Thursday, July 13, 2017 AT 09:08 PM (IST)
महाराष्ट्रातल्या सर्व म्हणजे 28 हजार 332 ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवडणूक यापुढे थेट जनतेद्वारे करायचा निर्णय राज्य सरकारने राजकीय हितलाभासाठी घेतला असला, तरी त्याचे दूरगामी परिणाम गावांच्या विकासावर होणार आहेत. 1958 पूर्वी तेव्हा अस्तित्वात असलेल्या स्थानिक स्वराज्य कायद्यानुसार सरपंचांची निवड थेट जनतेतूनच मतदानाद्वारे होत असे. पुढे जिल्हा परिषदा आणि पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्था कायद्यानुसार सरपंचांची निवड, निवडून आलेल्या गावच्या पंचायत सदस्यांच्या मतदानातून सुरू झाली. आता नगराध्यक्षांप्रमाणेच गावच्या सरपंचांची निवड थेट जनतेतून करायचा निर्णय घेतानाच, या नव्या पद्धतीने सत्तेवर येणार्‍या सरपंचांना अधिक अधिकार द्यायचेही ठरवले आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार्‍या आठ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकात सरपंचांची निवड थेट गावच्या मतदारांकडून होईल. यापुढे सरपंचांची निवडणूक लढवायसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल.
Wednesday, July 05, 2017 AT 08:58 PM (IST)
शेतकर्‍यांच्या संपामुळे राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्यावर, बारा दिवस उलटल्यावरही या कर्जमाफीच्या आणि तातडीने दहा हजार रुपये कर्ज द्यायच्या नियम आणि अटींचा घोळ  संपला नसल्याने, शेतकर्‍यांची ससेहोलपट मात्र सुरूच आहे. शेतकरी समन्वय समिती आणि सरकारने नेमलेल्या उच्चाधिकार मंत्रिगटात झालेल्या पहिल्या चर्चेच्या वेळी धनदांडग्या आणि श्रीमंत शेतकर्‍यांना ही कर्जमाफी मिळणार नाही, ही सरकारची भूमिका समन्वय समितीने मान्य केली होती. कर्जमाफीचा निर्णय अंमलात यायला आणखी चार महिने लागणार असल्याने, खरिपाच्या हंगामात बियाणे, खते आणि शेतीच्या अन्य कामांसाठी कर्जबाजारी शेतकर्‍यांना तातडीने प्रत्येकी दहा हजार रुपयांचे कर्ज द्यायची घोषणा सरकारने 12 जूनला केली. पण बँकांना तसे आदेश मिळाले नसल्याने, या तातडीच्या कर्जाचे वाटप सुरू झाले नाही. नोटाबंदीनंतर राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे जमा झालेल्या 2 हजार 700 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेने अद्यापही स्वीकारल्या नसल्याने, बँकांच्याकडे तातडीच्या कर्जासाठीही पुरेसा निधी नसल्याचे या बँकांचे म्हणणे होते.
Friday, June 23, 2017 AT 09:25 PM (IST)
महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकर्‍यांना दुधाचा खरेदी दर वाढवून मिळावा, ही संपकरी शेतकर्‍यांची मागणी सरकारने मान्य केल्याने, लाखो शेतकर्‍यांना दुधाला प्रतिलीटर तीन रुपये अधिक मिळणार आहेत. गेली अनेक वर्षे सहकारी आणि खाजगी दूध संस्थांकडून ग्राहकांना विकल्या जाणार्‍या दुधाच्या दरात आणि खरेदीच्या दरात प्रचंड तफावत असल्याने, दुधाची मलई नेमकी कोण खाते यावर वारंवार वादळी चर्चा होते. गेल्या तीन वर्षात ग्राहकांसाठी दुधाच्या विक्रीच्या दरात प्रतिलीटर सरासरी पंधरा रुपयांनी वाढ झाली. पण शेतकर्‍यांना मात्र त्या प्रमाणात दुधाचा खरेदी दर मिळत नाही, हे वास्तव आहे. शेतकर्‍यांकडून 24 रुपये लीटर दराने खाजगी आणि सहकारी दूध संस्थांकडून ग्राहकांना 42 रुपये लीटर दराने विकले जाते तर म्हशीच्या दुधाची खरेदी 33 रुपये लीटरने होते आणि  ग्राहकांना सरासरी 52 रुपये लीटरने विकले जाते. आता सरकारच्या आदेशानुसार गाय आणि म्हशीच्या दुधाचा खरेदी दर खाजगी-सहकारी संस्थांना 3 रुपयांनी वाढवून द्यावा लागेल. म्हणजेच गाईच्या दुधाची खरेदी 27 रुपये आणि म्हशीच्या दुधाची खरेदी 36 रुपये लीटरने दूध संस्थांना करावी लागेल.
Thursday, June 22, 2017 AT 08:58 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: