Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 3
तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या  निधनाने या राज्याच्या राजकारणात आपल्या राजकीय कर्तृत्वाच्या तेजाने तळपणारा द्रविडी अस्मितेचा ध्रुवतारा निखळला आहे. तमिळ भाषा आणि तमिळी संस्कृतीच्या भक्कम पायावरच स्थापन झालेल्या द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे सलग 50 वर्षे अध्यक्षपद आणि या राज्याचे पाच वेळा मुख्यमंत्रिपद भूषवायचा विक्रमही त्यांनी केला होता. भारताचे पहिले माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतच्या स्वातंत्र्यानंतरच्या  70 वर्षाच्या देशाच्या राजकीय घडामोडींचे, घटनांचे ते साक्षीदार होते. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि तमिळ आणि मागास, वंचित जनतेचा आधारवड काळाच्या पडद्याआड गेला. तमिळनाडूतल्या तिरुवरजवळच्या थिरूवलै या छोट्याशा खेड्यात 3 जून 1924 रोजी जन्मलेल्या करूणानिधी यांचे मूळ नाव दक्षिणामूर्ती. अल्पवयातच  प्राथमिक शिक्षण सोडल्यावर त्यांनी तमिळ चित्रपटांचे पटकथालेखन सुरू केले. 1938 मध्ये अलगिरी स्वामी यांचे भाषण ऐकून त्यांनी जस्टीस पार्टीत प्रवेश केला आणि ते सक्रिय राजकारणात उतरले. द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे संस्थापक ई. व्ही.
Thursday, August 09, 2018 AT 08:39 PM (IST)
सर्वार्थाने जागतिक खेळ असलेल्या 21 व्या जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यातल्या अटीतटीच्या रोमहर्षक सामन्यात फ्रान्सने जिगरबाज क्रोएशियाच्या बलाढ्य संघाचा 4-2 गोलने पराभव करून अखेर फुटबॉलचे विश्‍वचषकपद जिंकले आहे. तब्बल 20 वर्षांनी दुसर्‍यांदा फुटबॉलचा विश्‍वविजेता होण्याचे फ्रान्सचे स्वप्न रशियाची राजधानी मॉस्कोच्या लुझकिनी स्टेडियममधल्या लाखो प्रेक्षकांच्या साक्षीने साकार झाले आणि फ्रान्समध्ये विजयोत्सव सुरू झाला. या अंतिम सामन्यात सर्वार्थाने फ्रान्सचा संघ बलाढ्य होता. पण, अखेरच्या क्षणापर्यंत प्रतिस्पर्धी संघाशी जीव एकवटून झुंजायच्या क्रोएशियाच्या खेळाडूंची जिद्द अनुभवलेल्या मॉस्को आणि जगभरातल्या कोट्यवधी प्रेक्षकांना हा अंतिम सामना विलक्षण चुरशीचा होणार याची खात्री असल्यानेच जगभरातले फुटबॉलप्रेमी हा सामना पहायसाठी उपग्रह वाहिन्यांच्या दूरवाणी संचासमोर नजर एकवटून बसले होते.
Tuesday, July 17, 2018 AT 08:38 PM (IST)
या वर्षीच्या खरीप हंगामापासून अन्नधान्याला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिला जाईल, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांना अलीकडेच दिलेल्या          आश्‍वासनांची केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्तता केल्याने, शेतकर्‍यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. सरकारच्या या नव्या निर्णयानुसार खरिपाच्या चौदा पिकांच्या हमीभावात घसघशीत सरासरी चाळीस ते पन्नास टक्के म्हणजेच 2017 च्या तुलनेत प्रति क्विंटल 1400 ते 1800 रुपयांची वाढ झाल्याने, शेतकर्‍यांना केलेल्या श्रमाचे या नव्या हमीभावाने किमान दाम मिळेल, अशी अपेक्षा आहे. डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळावा, अशी मागणी गेली बारा वर्षे देशातल्या शेतकरी संघटना आणि शेतकर्‍यांनी आंदोलने, मोर्चेद्वारे सातत्याने केली होती. आपल्या सरकारच्या कारकिर्दीत शेतीचे उत्पादन दुप्पट करण्याबरोबरच वाजवी भाव द्यायची ग्वाही मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभात केली होती. गेल्या वर्षी खरिपाच्या चौदा पिकांच्या हमी भावात वाढ करून सरकारने त्यानुसार खरेदीही केली.
Friday, July 06, 2018 AT 08:26 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: