Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 66
5सातारा, दि. 19 : येथील जुन्या काळातील ज्येष्ठ छायाचित्रकार दत्तात्रय पुरुषोत्तम भिडे यांचे वयाच्या 77 व्या वर्षी पुणे येथे अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. दै. ‘ऐक्य’साठी छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली होती. दत्तात्रय भिडे हे दत्ता भिडे या नावानेच सर्वपरिचित होते. काही दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागल्याने सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृतीत फरक न पडल्याने त्यांना पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव सातारा येथील रामाचा गोट येथील निवासस्थानी आणण्यात आले. तेथे अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दत्ता भिडे यांचा येथील सदाशिव पेठेत प्रतिमा फोटो स्टुडिओ होता. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात त्यांच्या स्टुडिओत फोटो काढून घेण्यासाठी नेहमी गर्दी असायची. भिडे यांनी पूर्वीच्या काळात दै. ‘ऐक्य’मध्ये छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफीची जबाबदारीही चांगल्या पद्धतीने सांभाळली होती. उत्तम छायाचित्रकार असा त्यांचा लौकिक होता.
Wednesday, February 20, 2019 AT 09:04 PM (IST)
5सातारा, दि.17 : प्रतापसिंहनगर येथील लल्लन जाधव व त्याचा साथीदार बंटी लोमटे (रा.धनगरवाडी, सातारा) या दोघांनी दारू पिण्यासाठी पैसे मागत लोखंडी रॉड, पट्टा व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली असल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दत्ता भरत उदागे (वय 22, रा. प्रतापसिंहनगर) या युवकाने ही तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास दत्ता उदागे हा एमआयडीसीमधून जात असताना संशयितांनी त्याचा रस्ता अडवला. दारू पिण्यासाठी पैसे मागून त्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, मारहाणीबाबत कोणाला माहिती दिल्यास जिवंत सोडणार नसल्याची धमकीही लल्लन व त्याच्या साथीदाराने दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Monday, February 18, 2019 AT 08:36 PM (IST)
शिवसेनेकडून पाक ध्वजाची होळी पालिका पदाधिकार्‍यांकडून निषेध 5सातारा, दि. 15 : काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात गोरीपोरा येथे घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलातील 42 जवान शहीद झाले होते. पाकिस्तानमधील जैश ए महंमद या अतिरेकी संघटनेने हा हल्ला घडवून आणला होता. या भ्याड हल्ल्याचा सातारा पालिका, शिवसेना, भाजप, आरपीआय, राजेंद्र चोरगे मित्र समूह यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. जैश ए महंमद या अतिरेकी संघटनेने काल काश्मिरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर आत्मघाती हल्ला केल्यामुळे 42 जवान शहीद झाले तसेच 40 जवान जखमी झालेत. त्यामुळे कालपासूनच पाकिस्तानविरोधी लाट संपूर्ण देशात पहायला मिळाली. सातार्‍यातही आज सातारा पालिकेच्यावतीने या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करून अतिरेकी संघटनांना पाठीशी घालणार्‍या पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त करा, अशी एकमताने मागणी करण्यात आली. यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के म्हणाले, सातार्‍यातील जनतेच्यावतीने काल घडवलेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.
Saturday, February 16, 2019 AT 08:56 PM (IST)
5सातारा, दि. 14 : येथील शाहूनगर-मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे वाई येथून अपहरण करून बावधन येथील ओढ्यानजीक पूर्ववैमनस्यातून बेदम मारहाण करून त्याच्या पायावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. याबाबत आकाश दिलीप खैरमोडे (वय 21), रा. जाधव कॉलनी, शाहूनगर, सातारा याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मी कुटुंबासह शाहूनगर येथे वास्तव्य करतो. माझ्या शेजारीच धीरज तानाजी जगताप (वय 24), रा. जगतापवाडी हा राहतो. तो सातार्‍यातील श्रीकॉम ऑफिसमध्ये काम करीत आहे. त्यांची कंपनी कार्यक्रमाच्या ठिकाणी सीसीटीव्ही भाडेतत्त्वाने पुरवते. कंपनीने वाई येथील द्रविड हायस्कूलमध्ये कार्यक्रमास कॅमेरे पुरवले होते. दि. 10 रोजी दुपारी 3 वाजता मी माझ्या घरी असताना मित्र धीरज जगताप  व कंपनी सुपरवायझर शशिकांत चव्हाण यांच्यासमवेत वाई येथे चार चाकी वाहनाने 4.30 वाजता पोहोचलो. त्या ठिकाणी कॅमेरे काढत असताना रात्री 8.30 वाजता शहूनगर, सातारा येथे राहणारे मंगेश जगताप, वैभव घोलप यांनी मला तुला लय मस्ती आली आहे, तुला दाखवतो असे म्हणत इनोवा गाडीमध्ये बसवले.
Friday, February 15, 2019 AT 08:46 PM (IST)
5सातारा, दि.13 :येथील निरामय हॉस्पिटलमध्ये 57 लाखाची अफरातफर करणार्‍या शेखर गणपत शेळके (वय 25), रा. खिंडवाडी, ता. सातारा याला सदरबझार परिसरातून अटक करण्यात आली आहे. बजरंग ढेकळे, अविनाश चव्हाण, धीरज कुंभार, संतोष भिसे, पंकज ढाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. शेखर शेळके याच्याकडे पोलीस अफरातफर प्रकरणाची कसून चौकशी करीत आहे मात्र शेळके माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Thursday, February 14, 2019 AT 08:54 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: