Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 24
5सातारा, दि. 19 : दि. 18 रोजी येथील न्यायालय परिसरात असणार्‍या सातारा - कोरेगाव मार्गाकडेला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की विठ्ठल मारुती सावंत, रा. वेणेगाव, ता. सातारा यांच्या चुलत्यांच्या नावे असलेली दुचाकी क्रमांक (एम.एच. 11 बीटी 9604) ही दि. 18 रोजी येथील न्यायालय परिसरात असणार्‍या सातारा - कोरेगाव मार्गाकडेला लावली होती. ती सकाळी 10 ते 11. 30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
Thursday, June 20, 2019 AT 08:31 PM (IST)
5सातारा, दि. 17 : संभाजीनगर येथील यशवंत व अहिरे कॉलनी परिसरातील सर्वोदय अपार्टमेंटच्या पार्किंग लगतच्या मोकळ्या जागेत चादरीत गुंडाळलेल्या पंचवीस दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात कलम 318 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रवींद्र  किसन शिंदे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून या घटनेने सातार्‍यात एकच खळबळ उडाली आहे.  पोलीस सूत्रांकडून व फिर्यादीकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील सर्वोदय अपार्टमेंटच्या पार्किंगलगत असणार्‍या मोकळ्या जागेत तेथील जमा झालेला कचरा जाळण्यासाठी काही महिला जमा झाल्या होत्या. तेथूनच काही अंतरावर एका जळालेल्या चादरीतून मानवी पाय बाहेर आलेला दिसल्याने महिलांनी घाबरून त्याची इतरत्र खबर दिली.  तेथील लोकांनी जवळ जाऊन पाहिले असता पुरुष जातीचे साधारण पंचवीस दिवसाचे अर्भक चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत जाळण्यात आल्याचे दिसून आले.  या घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन तेथील रहिवासी रवींद्र किसन शिंदे यांनी फिर्याद दिली.
Tuesday, June 18, 2019 AT 08:59 PM (IST)
5सातारा, दि. 13 : नीरा-देवघरच्या पाण्यासाठी काढण्यात आलेला अध्यादेश आतापर्यंत स्वयंघोषित भगीरथांनी का काढला नाही, असा सवाल खा. उदयनराजेंनी उपस्थित केला. त्याचबरोबर खंडाळा तालुक्यातील पुनर्वसित जमिनींचे व्यवहार जिल्हा परिषद आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी केले आहेत. त्या व्यवहारांची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता असून फसवणूक झालेल्या धरणग्रस्तांनी माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे यांनी केले. नीरा-देवघर धरणामधील पाण्याचा कायद्याप्रमाणे पाणी वाटपाचा अध्यादेश सरकारने नुकताच काढला. अध्यादेशानुसार खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यातील शेतकर्‍यांवरील अन्याय दूर झाला. त्या पार्श्‍वभूमीवर गुरूवारी खा. उदयनराजेंनी आयोजित पत्रकार परिषदेत अध्यादेश काढण्यास 15 वर्षांचा कालावधी का लागला असा सवाल उपस्थित करत व ना. रामराजेंचा नामोल्लेख टाळत टीका केली. यावेळी डी. जी. बनकर, सुनील काटकर, संग्राम बर्गे आदी उपस्थित होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले म्हणाले, नीरा-देवघरच्या पाण्यासाठी सातत्याने आवाज उठविला. त्यावेळी आमची बिनपाण्याची केली गेली. एवढेच नव्हे तर टर उडविण्यात आली.
Friday, June 14, 2019 AT 08:28 PM (IST)
अतिक्रमणधारक मोकाट पालकमंत्र्यांची बोलाचीच कढी, बोलाचाच भात शशिकांत कणसे 5सातारा, दि. 11 : अजिंक्यतारा किल्ला परिसरात उगम पावलेल्या प्रसिद्ध सुळाच्या ओढ्याचा फास आवळण्याचे प्रकार अद्याप सुरूच असून प्रशासन त्यावर कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने या ओढ्यावरील अतिक्रमणधारक मोकाट सुटले आहेत. सुमारे एक वर्षापूर्वी नियोजन भवनातील बैठक झाल्यानंतर पालकमंत्री विजय शिवतारे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणार्‍या सुळाच्या ओढ्याची पाहणी करून ओढ्यावरील अतिक्रमणे काढण्याची ग्वाही दिली होती. त्यांची ग्वाही म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ठरली असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अजिंक्यतारा किल्ल्यावरील मंगळाईदेवी मंदिरानजीक सुळाचा ओढ्या व काळंबी ओढा असे दोन आहेत. हे ओढे विलासपूर मार्गे कृष्णा नदीला जाऊन मिळतात. नकाशातही या दोन ओढ्यांचे अस्तित्व आहे. साधारण दहा वर्षांपूर्वी शाहूनगर परिसरामध्ये सुळाच्या ओढ्यावर अतिक्रमणांचे मोठे पेव फुटले.
Wednesday, June 12, 2019 AT 09:05 PM (IST)
5सातारा, दि. 7 : एसीमधून वाया जाणार्‍या प्रतिदिन साडेचार लिटर पाण्याचा विनियोग झाडे जगवण्यासाठी करण्याचा उपक्रम आसिफ सय्यद, रा. दुर्गा पेठ, शाही मस्जिद समोर, सातारा यांनी गेल्या 2 वर्षापासून हाती घेतला आहे. सातार्‍यात एकीकडे पाण्याचा अपव्यय सुरू असताना दुसरीकडे मात्र आसिफ सय्यद यांनी गेल्या दोन वर्षांत लाखो लिटर पाणी वाचवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, आसिफ सय्यद हे गेली 20 वर्ष येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोकरी करत आहेत. नोकरी करत असताना समाजासाठी काहीतरी करण्याची संकल्पना त्यांनी आपले सहकारी आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजर वसुंधरा माने, कॉन्ट्रॅक्टर अनुप शिंदे, रसिक पटेल, हर्षद गुजर यांच्यासमोर मांडली. सर्वांच्या विचारातून मिशन ग्रुप अस्तित्वात आला. सर्वप्रथम या मंडळींनी अजिंक्यतारा किल्ल्यावर असणार्‍या मंगळाई देवीच्या मंदिरा पाठीमागे 25 ठिकाणी खड्डे घेऊन वृक्षारोपण केले. आज त्यापैकी 20 झाडांची वाढ अत्यंत चांगली झाली आहे. मध्यंतरीच्या काळात शेंद्रे, ता.
Saturday, June 08, 2019 AT 08:47 PM (IST)
1 2 3 4 5
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: