Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 23
5सातारा, दि. 16 : सातारा रेल्वे स्थानकासमोरील आरपीएफ बॅरेकसमोर शेडमध्ये पार्क केलेली बुलेट अज्ञाताने पेटवून दिल्याने यामध्ये बुलेटचे 15 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार रेल्वे कर्मचारी अब्राउद्दीन ईब्राहिम बागवान (वय 48), रा. आरपीएफ बॅरेक, रेल्वे स्थानकासमोर, माहुली, सातारा यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अब्राउद्दीन बागवान हे रेल्वेचे कर्मचारी असून दि. 15 रोजी रात्री पावणेतीनच्या सुमारास अज्ञाताने त्यांची शेडमध्ये पार्क केलेली बुलेट क्रमांक (एम. एच. 12, क्यु. एच. 2037) पेटवून दिली. या घटनेत बुलेटचे वायरिंग  तसेच सीट जळून खाक झाल्याने 15 हजार रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला. सहाय्यक फौजदार घाडगे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Tuesday, September 17, 2019 AT 08:36 PM (IST)
5सातारा, दि. 27 : शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणांच्या मुद्द्यासह ठिक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या मुद्द्यांवर शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे, सामाजिक कार्यकर्ते चिन्मय कुलकर्णी, मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, सातारा शहरात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली डॉल्बीमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना यापुढेही सुरू ठेवावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये आज दुपारी 12 वाजता गणेशोत्सव आणि मोहरम सणाच्या पार्श्‍वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक जिल्हाधिकारी श्‍वेता सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर गोरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत पार पडली.
Wednesday, August 28, 2019 AT 09:03 PM (IST)
5सातारा, दि. 8 : विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाळू रंगनाथ शिंदे (वय 30) मूळ रा. मुंगेवाडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर सध्या रा. रहिमतपूर यांना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रहिमतपूर  गावच्या शिवारामध्ये झाडाची फांदी तोडताना इलेक्ट्रिक वायर तुटून त्यांना विजेचा धक्का बसल्याने उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
Friday, August 09, 2019 AT 08:39 PM (IST)
5सातारा, दि. 1 : जिल्ह्याच्या काही भागात आज दिवसभर पावसाची धो धो सुरूच राहिल्यामुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. संगम माहुली, ता. सातारा येथील कृष्णा नदी पात्राच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचे आज दिसून आले. काशिविश्‍वेश्‍वर मंदिराच्या पायर्‍यांवर पाणी आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सातारा- लोणंद मार्गावरील वाठार स्टेशन, ता. कोरेगाव नजीक रेल्वे वरील पूल खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह कोरेगाव, खंडाळा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पाटण, महाबळेश्‍वर, जावली व वाई तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत. कृष्णा, वेण्णा, कोयना नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोयना धरणातून पाणी सोडल्याने कराड शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे.
Friday, August 02, 2019 AT 08:49 PM (IST)
5सातारा, दि. 31 : दाखल गुन्ह्यात फिर्यादीला मदत करण्यासाठी तीन हजाराची लाच स्वीकारताना वडूज पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक सुरेश गुलाब हांगे, रा. पळशी, ता. माण याला एसीबीने ताब्यात घेतले आहे. म्हासुर्णे, ता.खटाव येथील एका व्यक्तीला त्याच्या सुनेने दाखल केलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी हांगे याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची पडताळणी केली. त्यात हांगे तीन हजाराची लाच मागत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला एसीबीने बुधवारी सकाळी साडे अकराच्या समारास ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास एसीबीचे डीवायएसपी अशोक शिर्के करत आहेत. ही कारवाई डीवायएसपी अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार साळुंखे, राजे, अडसूळ, ताटे, कर्णे, अडागळे, खरात, काटकर, भोसले यांनी केली.
Thursday, August 01, 2019 AT 08:56 PM (IST)
1 2 3 4 5
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: