Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 3
एस. एन. भागवत सातारा जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी 5सातारा, दि. 16 : सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची आज पालघरच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली. त्यांच्या जागेवर एस. एन. भागवत हे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी रुजू होणार आहेत. तीन वर्षांपूर्वी डॉ. कैलास शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाची सूत्रे स्वीकारली होती. अधिकारी- कर्मचार्‍यांमध्ये शिस्त, पारदर्शक कारभार आणि लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊन पुढे जात त्यांनी सातारा जिल्हा परिषदेला उंचावर नेऊन ठेवले. महिलांसाठी माहेरवाशीण योजना राबवून विषेशत: गरोदर महिलांना त्यांनी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. समृद्धी योजनेच्या माध्यमातून 70 लाख रुपये खर्चून मुलींसाठी सायकली वाटप केल्या. प्राधान्याने शाळा, शाळेतील शौचालय दुरुस्तीवर भर देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीमध्ये सातत्याने कशी वाढ होईल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तीन वर्षांमध्ये जिल्ह्यात 11 हजार घरकुले त्यांच्या कार्यकालात बांधली गेली.
Wednesday, July 17, 2019 AT 09:00 PM (IST)
मांडूळ, मोबाईल, कारसह 56 लाखाचा मुद्देमाल ताब्यात 5सातारा, दि. 13 : शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीत दुर्मीळ मांडूळ जातीच्या सर्पाची तस्करी करण्यासाठी आलेल्या तीन युवकांना सातारा तालुका पोलिसांनी जेरबंद केले. या युवकांकडून मांडूळ सर्प, मोबाईल व इनोव्हा कार असा एकूण 56 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून कारवाईनंतर या युवकांना पुढील कारवाईसाठी सातारा वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, अंधश्रद्धेपोटी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मांडूळ सर्पाची किंमत 50 लाख ते एक करोडपर्यंत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक उत्तम कोळी व सुजित भोसले यांना खास बातमीदारामार्फत काही युवक शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीतील चिंध्यापीर या ठिकाणी दुर्मीळ मांडूळ सर्प विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानंतर मग सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँच पथकातील पोलीस नाईक सुजित भोसले, उत्तम कोळी, कॉन्स्टेबल संदीप कुंभार, रमेश चव्हाण व वनपाल श्रीकांत वसावे यांनी त्या ठिकाणी सापळा रचला.
Friday, June 14, 2019 AT 08:35 PM (IST)
सातार्‍यातील प्रकार पूर्णवेळ सिग्नल सुरू ठेवण्याची मागणी शशिकांत कणसे 5सातारा, दि. 31 : वाहतूक पोलिसांनी पाठ फिरवली, की सिग्नल बंद होत असल्याचा प्रकार सातार्‍यामध्ये घडू लागला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असा प्रकार होत असल्याने वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त होऊ लागली असून सिग्नलअभावी वाहतुकीची शिस्त मोडत असल्याने पूर्णवेळ सिग्नल सुरू ठेवण्याची मागणी वाहनचालकांमधून होऊ लागली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सातार्‍यात होणारी वाहतुकीची कोंडी, भरधाव वेगाने-बेशिस्तपणे वाहने चालविणे असे प्रकार वारंवार घडत होते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या पुढाकाराने सातारा शहरांमध्ये सर्वप्रथम 1992 साली पोवई नाका येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. 6 महिन्यातच ती बंद पडली. ती तब्बल 12 वर्षांनंतर म्हणजेच 2004 झाली पुन्हा कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे पोवई नाक्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत झाली. जिल्हा परिषद ते विसावा नाका दरम्यान अपघातांच्या संख्येत वाढ होऊ लागली.
Saturday, June 01, 2019 AT 08:59 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: