Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 3
5सातारा, दि. 9 : सदरबझार येथे बुधवारी विनापरवाना रास्ता रोको केल्याबद्दल माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांच्यासह 60 ते 70 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी अनिल पवार यांनी फिर्याद दिली आहे. माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, शरद प्रल्हाद गायकवाड, मेहबूब खान, बाळासाहेब गुळवे, वीरेंद्र चव्हाण, शैलेंद्र इलगे, मौलाआली डोंगरे, रसूल शेख, शब्बीर डोणगे यांच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सदरबझार येथील भीमाबाई आंबेडकर घरकुल योजनेतून वाटप करण्यात आलेल्या लाभधारकांना सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी सदरबझार येथील हिरवाई चौकात रास्ता रोको आंदोलन केले. हे आंदोलन करताना शंकर माळवदे यांच्यासह 60 ते 70 जणांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती.  विनापरवाना रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनीच त्यांच्या विरोधात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
Friday, November 10, 2017 AT 08:48 PM (IST)
सावकारीला कंटाळून महिलेची आत्महत्या? 5सातारा, दि. 27 : खाजगी सावकारीचा कणा पोलिसांनी मोडला असला तरी खाजगी सावकारांची दादागिरी आणि दहशत संपण्याचे नावघेईनासेझाले आहे. दररोज नवनवीन प्रकरणे प्रकाशात येत असून खाजगी सावकारीची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे पुढे आले आहे.  मांडवे,  ता. सातारा येथे एकाला खाजगी सावकारी प्रकरणात आठ जणांनी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करुन कोर्‍या स्टॅम्प व चेकवर स्वाक्षर्‍या घेतल्या असून या प्रकरणात तक्रादाराच्या बहिणीने सावकारीला कंटाळून आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील झाले आहे. या प्रकरणात सुदाम रामचंद्र शिंदे, संदीप रामचंद्र शिंदे (दोघे रा. पाटखळ), प्रदीप साळुंखे (रा. खेड, सातारा) व अनोळखी 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अमोल सुभाष पवार (रा. मांडवे) यांनी शहर पोलीसठाण्यात तक्रार दिली असून अधिक माहिती अशी, तक्रारदार अमोल पवार यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये संशयितांकडून 10 टक्के व्याजदाराने 5 लाख 92 हजार रुपये घेतले होते.  व्याजाने पैसे घेतल्यानंतर संशयितांनी पैशाचा तगादा लावला.
Saturday, October 28, 2017 AT 09:03 PM (IST)
5सातारा, दि. 30 : गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी सातारा शहर उपविभागातील 39 जणांना सहा दिवसांसाठी सातार्‍यातून तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये स्वीकृत नगरसेवक अतुल चव्हाण याचाही समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गणेशोत्सव दि. 25 ऑगस्टपासून सुरू झाला असून दि. 5 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. गणेशोत्सवाचा सण शांततेत पार पाडण्यासाठी, कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून सातारा शहर उपविभागातील सातारा शहर, सातारातालुका आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील 39 गुन्हेगारांना उपविभागीय पोलीस अधिकारी तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी डॉ. खंडेराव धरणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये दि. 1 सप्टेंबर ते दि. 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत सातारा शहर, तालुका आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येण्यास, वास्तव्य करण्यास व मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तडीपार केलेल्यांमध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्यातील मनोज चंद्रकांत घाडगे (रा. गेंडामाळ झोपडपट्टी, सातारा), गणेश दादा थोरात (रा.
Thursday, August 31, 2017 AT 08:49 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: