Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 70
5नवी दिल्ली, दि. 17 (वृत्तसंस्था) : देशातील विविध भागात अवैधरीत्या दाखल झालेल्या आणि वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांना इंच-इंच जमिनीवरून बाहेर काढू, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत या संदर्भातील एका प्रश्‍नाला उत्तर देताना दिला. केंद्र सरकारच्या या धोरणाची कडक अंमलबजावणी करण्याची घोषणाच त्यांनी यावेळी केली. राष्ट्रीय नागरिक नोंदणीवर (एनआरसी) चर्चा करताना शाह म्हणाले, हा आसाम कराराचा भाग आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातही
Thursday, July 18, 2019 AT 08:28 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 16 (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटके प्रकरणी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) उद्या (बुधवार) निकाल देण्यात येणार आहे. हा निकाल आपल्या बाजूने लागेल, अशी भारताला आशा आहे. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपांर्तगत कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या शिक्षेविरोधात भारताने आयसीजेकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना आयसीजेने मे 2017 मध्ये जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. तसेच आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. आता न्यायालय उद्या आपला निकाल देणार आहे. याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या प्रकरणात पाकिस्तानचे म्हणणे आहे, की हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानी सैन्याने मार्च 2016 मध्ये जाधव यांना बलुचिस्तानमधून ताब्यात घेतले होते. मात्र, भारताने पाकचा हा दावा नेहमीच नाकारला आहे. भारताने म्हटले आहे, की जाधव हे भारतीय नौदलाचे अधिकारी होते.      त्यांचे इराणमधून अपहरण करुन पाकिस्तानात आणण्यात आले होते. जाधव यांचा इराणमध्ये स्वतःचा व्यवसाय आहे.
Wednesday, July 17, 2019 AT 08:27 PM (IST)
5बंगळुरू, दि. 15 (वृत्तसंस्था) : कर्नाटकचे राजकीय नाट्य आता अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारविरोधात गुरुवार, दि. 18 रोजी विधानसभेत अविश्‍वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. यानंतर विधानसभेत मतदान होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कर्नाटकातील राजकीय नाट्याचा गुरुवारी समारोप होणार आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामींना या दिवशी बहुमत सिद्ध करण्यासाठी शक्तिप्रदर्शन करावे लागणार आहे. या अगोदर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याकडून बहुमत सिद्ध करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती, ज्यावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला आहे. काँग्रेस आणि जेडीएसला आशा आहे, की बंडखोर आमदार त्यांना साथ देतील व सरकार वाचवण्यास मदत करतील तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरमय्या यांनी देखील म्हटले आहे, की चर्चेनंतर विश्‍वासदर्शक ठरावावर 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. या अगोदर भाजपने कर्नाटक विधानसभा अध्यक्षांकडे विश्‍वासदर्शक ठरावासाठी तारीख निश्‍चित करण्याची मागणी केली होती.
Tuesday, July 16, 2019 AT 08:29 PM (IST)
5पंजाब, दि. 14 (वृत्तसंस्था) : पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामागे सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यातील मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वीच 10 जून रोजी सिद्धू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून त्याचा आज खुलासा केला आहे. सिद्धूंनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.          पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना लवकरच आपला राजीनामा सोपवणार असल्याचे ट्विटही सिद्धूंनी केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील मतभेद लोकसभा निवडणुकीनंतर समोर आले होते. पंजाबमध्ये सत्ता असूनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नव्हते. याचे खापर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सिद्धूंवर फोडून त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली होती. त्यानंतर दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला होता. लोकसभा निवडणुकीनंतर पंजाब राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीला हजर न राहता सिद्धूंनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.
Monday, July 15, 2019 AT 08:28 PM (IST)
उत्तर देण्यासाठी राज्य सरकारला दोन आठवड्यांची मुदत 5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाला आव्हान देणार्‍या याचिकांवर पार पडलेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास तुर्तास नकार दिला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकारला नोटीस पाठवली असून उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. राज्य सरकारने दोन आठवड्यांनंतर आपले उत्तर दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय पुढील निर्णय घेणार आहे. मराठा आरक्षणाविरोधातील दोन याचिकांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्य पीठापुढे आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. कुणबी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) संघटनांकडूनही दोन आव्हान याचिका सादर करण्यात आल्या होत्या. संजीव शुक्ला आणि अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला आव्हान देणार्‍या दोन याचिका सादर केल्या असून मराठा आरक्षणाचे समर्थक विनोद पाटील यांनी कॅव्हिएट दाखल केले आहे.
Saturday, July 13, 2019 AT 08:45 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: