Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 3
5लाहोर, दि. 17 (वृत्तसंस्था) : लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. हाफिज सईद लाहोरहून गुजरावाला येथे निघाला असताना दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केली.  हाफिजला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब प्रांतातील पोलिसांनी हाफिज सईद याच्या विरोधात दहशतवादाला पैसा पुरवणे आणि आर्थिक गैरव्यवहार या आरोपांखाली एफआयआर दाखल केला होता. त्याचवेळी त्याला अटक होणार, अशी चर्चा होती. हाफिजने फक्त मुंबईवरच नव्हे तर देशाच्या वेगवेगळया भागात दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. पाकिस्तानच्या हाफिज सईद विरोधात एफआयआर दाखल करण्याच्या कृतीवर हा सर्व डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार असल्याचे भारताने म्हटले होते. दहशतवादी कायद्याखाली पाकिस्तान सरकारने 2017 मध्ये हाफिझ सईद आणि त्याच्या चार सहकार्‍यांना ताब्यात घेतले होते. पण 11 महिन्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. पाकिस्तान त्यांच्या भूमीवरील दहशतवाद्यांविरोधात ठोस, सत्याच्या कसोटीवर टिकणारी कारवाई करेल.
Thursday, July 18, 2019 AT 08:33 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांनी अखेर मौन सोडले आहे. पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राहुल यांनी धाडसी निर्णय घेतले असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन धाडस दाखवले आहे. काही लोकांमध्येच, असे धाडस दाखवण्याची क्षमता असते. मी त्यांच्या निर्णयाचं मनापासून स्वागत करते. लोकसभा निवडणुकीतील पक्षाचा आणि अमेठीतून स्वत:च्या झालेल्या पराभवामुळे राहुल गांधी व्यथित होते. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी केली. मात्र, त्याला ते बधले नाहीत. त्यामुळे प्रियांका वाड्रा यांनी प्रथमच राहुल यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत त्यांचा निर्णय योग्यच असल्याचे म्हटले आहे.
Friday, July 05, 2019 AT 08:37 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 26 (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रात भारताला एक मोठे राजकीय यश मिळाले आहे. आशिया-पॅसिफिक संयुक्त राष्ट्र समूहाने सर्वानुमते 2021-22 या दोन वर्षांसाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये म्हणजेच युएनएससी मध्ये भारताच्या अस्थायी सदस्यत्वासाठी पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी भारताने अशी काही राजकीय कोंडी निर्माण केली होती, की चक्क पाकिस्तानला देखील भारतच्या सदस्यत्वासाठी पाठिंबा द्यावा लागला म्हणून हा एकप्रकारे आंरराष्ट्रीय स्तरावरील भारताचा राजकीय विजय मानला जात आहे. 2021-22 या दोन वर्षासाठी सुरक्षा परिषदेवर 5 अस्थायी सदस्य निवड करण्याची प्रक्रिया जून 2020 ला होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये भारताला पाठिंबा देण्याचा निर्णय आशिया-पॅसिफिक समूहाने सर्वानुमते घेतला आहे. याबाबतची माहिती भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
Thursday, June 27, 2019 AT 08:45 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: