Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 3
5नवी दिल्ली, दि. 30 (वृत्तसंस्था) : केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या अनेक तरतुदी नव्या आर्थिक वर्षात 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. त्यामध्ये दीर्घकालीन भांडवली गुंतवणुकीवरील एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या लाभावर 10 टक्के प्राप्तिकर, सर्व प्रकारच्या करपात्र उत्पन्नावर सध्याच्या तीन टक्के शैक्षणिक व आरोग्य उपकराऐवजी 4 टक्के उपकर या तरतुदी नव्या आर्थिक वर्षात लागू होणार आहेत.
Saturday, March 31, 2018 AT 08:55 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 20 (वृत्तसंस्था) : संगीतकार इलियाराजा यांच्यासह 40 हून अधिक जणांना मंगळवारी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या या सोहळ्यात संगीतकार इलायराजा, शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खान आणि विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष पी. परमेश्‍वरन यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यंदा देशभरातील 85 जणांना विविध पद्म पुरस्कार जाहीर झाले. (यामध्ये विभागून दिलेल्या दोन पुरस्कारांचा समावेश) पद्म पुरस्कारांमध्ये 3 जणांना पद्मविभूषण, 9 जणांना पद्मभूषण आणि 73 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये 14 महिलांचा तर 16 अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. 3 जणांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापैकी 43 मान्यवरांना आज पुरस्कार वितरित करण्यात आले.
Wednesday, March 21, 2018 AT 08:26 PM (IST)
5शिलाँग, दि. 4 (वृत्तसंस्था) : मेघालयमध्ये सत्तास्थापनेचे काँग्रेसचे स्वप्न भंगले आहे. एनपीपी, यूडीपी, पीडीएफ, भाजप आणि एचएसपीडीपी या काँग्रेसेतर पक्षांनी एनपीपीच्या नेतृत्वाखाली आघाडीची मोट बांधत सत्तास्थापनेसाठी राज्यपाल गंगा प्रसाद यांच्याकडे दावा केला आहे. राज्यपालांनीही या आघाडीला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. एनपीपीचे नेते कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होणार आहे. दि. 6 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार असल्याचे वृत्त ङ्गएएनआयफने दिले आहे. 60 सदस्य संख्या असलेल्या मेघालय विधानसभेत 21 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने आज राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला होता. काँग्रेस नेते मुकुल संगमा यांनी राज्यपालांची भेट घेऊन हा दावा केला. मात्र, त्यानंतर काही तासातच सत्तेचे समीकरण पालटले. काँग्रेसेतर सर्व पक्षांनी आघाडीची मोट बांधत काँग्रेसला जोरदार धक्का दिला. या आघाडीने राज्यपालांची भेट घेऊन 34 आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र दिले व कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा दावा केला. हा दावा राज्यपालांनी मान्य केला.
Monday, March 05, 2018 AT 08:51 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: