Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 72
5कराड,दि. 13 ः येथील बाराडबरी परिसरात कराड नगरपालिकेच्या कचर्‍याच्या बायो-मॅनिंगच्या मशीनमध्येअडकून अतुल  रमेश कावडे (वय 27, रा. चांदोरे, ता. तिरोडा, जि. गोंदिया) या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत किरण कुमार कांबळे (रा. बुधवार पेठ, कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराडमध्ये बाराडबरी परिसरात नगरपालिकेचा कचरा डेपो आहे. तेथे बायोमॅनिंग मशीनच्या सहाय्याने कचर्‍याचे वर्गीकरण होते. या मशीनवर काम करत असताना अतुल कावडे हा मशीनमध्ये कमरेपर्यंत आत जाऊन अडकला. त्यामुळेे त्याचा मृत्यू झाला.
Friday, December 14, 2018 AT 09:24 PM (IST)
5फलटण, दि. 12 : फलटण नगरपरिषदेने शहरा-तील मालमत्तांचे मूल्यांकन करून कर आकारणी करताना केलेली कार्यवाही नियमानुसार आणि कायद्यातील तरतुदी-प्रमाणे करण्यात आली आहे. तथापि, त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करून देण्याचे आश्‍वासन श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले. फलटण नगरपरिषदेद्वारे शहरातील मालमत्तांच्या कर आकारणीबाबत पाठविण्यात आलेली बिले चुकीची व बेकायदेशीर आहे. नगर परिषदेतील विरोधी पक्ष व अन्य पक्षीयांनी आंदोलन पुकारले असल्याच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक पत्रकारांशी  ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, नगरसेवक अजय माळवे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे उपस्थित होते. नगरपरिषदेने केलेली कर आकारणी नगर परिषद अधि-नियमातील कलम 119 (1) व 124 अन्वये बिलाद्वारे मालमत्ताधारकांना पाठविण्यात आली आहे. तथापि, ही बिले म्हणजे अंतिम बिल नव्हे.
Thursday, December 13, 2018 AT 08:56 PM (IST)
5महाबळेश्‍वर, दि. 11 : महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्‍वरमध्ये थंडीचा जोर वाढला असून आज वेण्णा लेक परिसर मोठ्या प्रमाणावर गारठल्यामुळे परिसरात हिमकण जमा झाल्याचे पहावयास मिळाले. नौकाविहारासाठी बोटीमध्ये चढ-उतार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचल्याचे दिसत होते असेच चित्र या परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असणार्‍या गाड्यांच्या टपांवर तसेच झोपड्यांच्या छप्परांवर पहावयास मिळाले. गाड्यांचे टप व झोपड्यांचे छप्पर तसेच लिंगमाळा परिसरातील स्मृतिवन परिसर व तेथील रान फुले त्याच्या शेंगावर दवबिंदू गोठून तयार झालेल्या हिमकणांमुळे पांढरे झाल्याचे दिसत होते. दरम्यान थंडीच्या हंगामात या वर्षी हिमकण दिसण्याची ही पहिलीच वेळ असल्याने त्याबद्दल विशेष कुतूहल होते व त्याचा आनंदही स्थानिकांसह फिरायला आलेल्या पर्यटकांनी घेतला. हवामान खात्याच्या नोंदीनुसार आज या पर्यटन स्थळाचे किमान तापमान 13.5 अंश डिग्री सेल्सियस आहे. दरम्यान वेण्णा तलाव ते लिंगमळा परिसरात 3 ते 4 अंश डिग्री सेल्सियसच्या दरम्यान असण्याची शक्यता जाणकार शेतकरी वर्तवितात. गेले दोन दिवस या पर्यटनस्थळी गार वार्‍यासह कडाक्याची थंडी होती.
Wednesday, December 12, 2018 AT 08:37 PM (IST)
5लोणंद, दि. 9 : नीरा रोडवरील बाळुपाटलाचीवाडी गावच्या हद्दीत बागवान पेट्रोल पंपासमोर पिकअपमधून नायकोबाचीवाडी मासाळवाडी येथे दर्शनासाठी जाताना पिकअप व बोलेरो यांच्यात समोरासमोर अपघात होवून त्यात गुलाब सतू हाके (वय 54), रा. शेडगेवाडी हे ठार झाले. या अपघातात अकरा जण जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली आहे बाळुपाटलाचीवाडी, ता. खंडाळा  गावच्या हद्दीत लोणंद ते नीरा जाणार्‍या रोडवर बागवान पेट्रोल पंपाच्या पुढे असलेल्या सर्व्हिसिंग सेंटर जवळ आज दुपारी  पिकअपमधून हिंदुराव दत्तू  हाके हे घरातील लोकांना घेऊन मासाळवाडी, ता. बारामती येथे नायकोबा देवाच्या दर्शनासाठी निघाले होते. त्याच वेळी नीरा बाजूकडून लोणंदकडे बोलेरो जीप (क्र. एम. एच. 42 के 8766) निघाली होती. या जीपवरील चालक तेजस विठ्ठल बोराटे (रा लासुर्णे, ता. इंदापूर) याने हयगयरीत्या गाडी चालवून विरूद्ध दिशेने निघालेल्या पिकअपला उजव्या बाजूस जोराची धडक दिली. या धडकेत पिकअप पलटी झाली. त्यात पिकअपमधील गुलाब सतू हाके (वय 54, रा. शेडगेवाडी) हे ठार झाले.
Monday, December 10, 2018 AT 09:11 PM (IST)
5पाटण, दि. 7 : पाटण-कराड रस्त्यावर मल्हारपेठ हायस्कूल समोर मळी वाहतूक करणार्‍या टँकरला अचानक आग लागून संपूर्ण टँकरने पेट घेतला. शुक्रवारी सायंकाळी 7 च्या सुमारास पाटणच्या दिशेने जाणारा मळी वाहतूक करणारा टँकर (क्र. एम. एच. 50-2517) हा मल्हारपेठच्या श्रीसंत तुकाराम विद्यालयासमोर पुढील टायर फुटल्याने उभा होता. त्यावेळी टँकरने तेलाच्या टाकीसह पेट घेऊन अचानक मोठी आग लागली. यात मोठे नुकसान झाले. गाडी एक तास जळत होती. तरीही घटनास्थळावर अग्निशामकच्या गाड्या आल्या नव्हत्या. दरम्यान, कराड-पाटण मार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प होती. जमलेल्या ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत आग विझवण्यासाठी धडपड केली. पोलीस या संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत.
Saturday, December 08, 2018 AT 08:53 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: