Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 50
बापूराव खुस्पेंचा संसार उघड्यावर, 2 लाखाचे नुकसान 5पळशी, दि.16 : राणंद येथील घुमट वस्ती येथील बापूराव खाशाबा खुस्पे यांचे छपराचे घर अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाले. ही घटना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. आगीत घरातील भांडी, धान्य व संसारोपयोगी साहित्य, असे एकूण 2 लाख रुपयांचे नुकसान झाले. राणंद येथील शिवाजीनगर येथील घुमट वस्तीवर बापूराव खाशाबा खुस्पे यांच्यासह पाच जणांचे कुटुंब राहत आहे. आग लागली त्यावेळी शेषाबाई खुस्पे या घरी झोपल्या होत्या. आगीच्या धगीने त्यांना जाग आली. त्या घराबाहेर पळाल्या. आजूबाजूला राहणार्‍या लोकांनी व तरुणांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. दोन तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत छप्परचे घर व घरातील साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत भांडी, पिठाची चक्की, मिरची कांडप यंत्र, धान्य व इतर साहित्य जळून खाक झाले. घराचेही मोठे नुकसान झाले. पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे यांनी घटनास्थळी भेट देत खुस्पे यांना शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी केली. गवकामगार तलाठी नितीन गाडे, ग्रामसेवक नंदकुमार फडतरे, कोतवाल कृष्णदेव गुजर व पोलीस पाटील सौ.
Thursday, January 17, 2019 AT 09:13 PM (IST)
5महाबळेश्‍वर, दि. 14 : महाबळेश्‍वरचे माजी नगराध्यक्ष, पी. डी. पार्टे उद्योग समूहाचे शिल्पकार व ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक पी. डी. पार्टे (शेठ) यांचे सोमवारी रात्री मुंबई येथे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी महाबळेश्‍वर येथे कळताच शहरावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. विद्यमान नगरसेविका व माजी नगराध्यक्षा विमलताई पार्टे यांचे ते पती होत. पी. डी. पार्टे यांच्या पार्थिवावर उद्या, दि 15 रोजी महाबळेश्‍वर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Tuesday, January 15, 2019 AT 08:56 PM (IST)
5म्हसवड, दि. 6 : म्हसवड परिसरात दुचाकी चोरून दुचाकी मालकांना बेजार करणार्‍या त्रिकुटांचा म्हसवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तीन बुलेट व पाच मोटारसायकल आणि एक अ‍ॅक्टिवा असा साडेसहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चोरट्यांमध्ये दोन अल्पवयीन मुले व एका तरूणाचा समावेश आहे. दुचाकी चोरटे जेरबंद झाल्यामुळे दुचाकी मालकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. या धडाकेबाज कारवाईबद्दल म्हसवडचे सपोनि. मालोजीराव देशमुख व त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन केले. याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती, अशी म्हसवड आटपाडी-दिघंची-दहिवडी हद्दीत अनेक मोटारसायकली चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात  दाखल झाल्या  आहेत. मोटारसायकल चोरी करुन बनावट नंबर प्लेट तयार करून त्या दुसर्‍या जिल्ह्यात विकल्या जात असल्यामुळे चोरीच्या गाड्या सापडत नव्हत्या व चोरटेही सापडत नव्हते. प्रत्येक वेळी चोरटे गुंगारा देवून पळून जाण्यात यशस्वी होत होते. पोलीस हवालदार अभिजित भादुले यांनी अनेक ठिकाणी पोलीस खबर्‍यांच्या सहकार्याने तपासाला गती दिली होती.
Monday, January 07, 2019 AT 08:45 PM (IST)
5कुडाळ, दि. 4 : फलटण येथील कमला निंबकर बालभवन या शाळेची सहल जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे येथे आली असता वडाच्या पारंब्यांशी खेळताना प्रज्वल नितीन गायकवाड (वय 11, रा. अलगुडेवाडी) या इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या डोक्यात झाडाची पारंबी पडली. या दुर्घटनेत तो जागीच ठार झाला. जावली तालुक्यातील प्रसिद्ध वडाचे म्हसवे या गावामध्ये मुलांना वडाची झाडे दाखवण्यासाठी फलटण येथील कमला निंबकर बालभवन या शाळेची सहल आली होती. त्या ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडाच्या पारंबीला लोंबकळत असताना प्रज्वल गायकवाड या मुलाच्या डोक्यात वडाची पारंबी तुटून पडल्याने तो जागीच ठार झाला. त्याला कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काळ आणण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले.
Saturday, January 05, 2019 AT 09:19 PM (IST)
शेतकर्‍यांच्या उसाचे 47 कोटी रुपये न दिल्याने कारवाई 5फलटण, दि. 27 : न्यू फलटण शुगर वर्क्स, साखरवाडी, ता. फलटण या साखर कारखान्याने गतवर्षीच्या हंगामात गाळप केेलेल्या उसाचे सुमारे 47 कोटी 86 लाख 98 रुपये ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिले नसल्याने साखर आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी या कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून ताब्यात घेतली आहे. त्यापैकी पिंपळवाडी, ता. फलटण येथील जमिनीचा जाहीर लिलाव सोमवार, दि. 28 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता फलटण तहसील कार्यालयात होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी दिली.
Friday, December 28, 2018 AT 08:56 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: