Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 6
5चाफळ, दि. 9 : तू आठवडा बाजारात तुझी जीप घेवून कशासाठी येतोस, त्याचा लोकांना त्रास होतो असे म्हणून चिडून चंद्रकांत महादेव भाईगडे याने स्वत:च्या जीपमधील डबलबार बंदुकीने दि. 25 ऑगस्ट 2016 रोजी चाफळ बसस्थानकासमोर विकास बबन साळुंखे (वय 40, रा. भांबेवाडी, चाफळ) याच्यावर दोन राऊंड फायर करून त्याचा खून केला होता. या प्रकरणी उंब्रज पोलिसांनी आरोपी चंद्रकांत भाईगडे विरोधात कराड येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी होवून कराडचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. एच. केळूसकर यांनी आरोपी चंद्रकांत भाईगडे याला दोषी धरून आजन्म कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी, जाधववाडी (चाफळ) येथील रहिवाशी आरोपी चंद्रकांत महादेव भाईगडे याने दि. 25 ऑगस्ट 2016 रोजी चाफळ बसस्थानकासमोर विकास बबन साळुंखे (वय 40, रा. भांबेवाडी, चाफळ) याला तू आठवडा बाजारात तुझी जीप घेवून कशासाठी येतोस.
Friday, May 10, 2019 AT 08:46 PM (IST)
5कराड, दि. 5 : घराचे खोदकाम करताना सापडलेले अर्धा किलो सोने 5 लाख रूपयास देतो, असे सांगून चौघांनी पितळेचे दागिने देऊन एका बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संजय विजय सणस (रा. मरळी, ता. पाटण) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी प्रवीण बह्मनंद वेणेकर (वय 28, रा. गणेशनगर, ता. मुडगोड, जि. कारवार) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अन्य तीन जण फरार आहेत. मंजुनाथ बंजत्री (रा. गणेशनगर, मुडगोड, जि. कारवार) व अन्य दोघे जण (नावे समजू शकली नाहीत) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय सणस यांच्याकडे मंजुनाथ बंजत्री हा गवंडी काम करण्यासाठी होता. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि गवंडी यांची पूर्वीची ओळख होती. गवंडी बंजत्री याने संजय सणस याला फोन करून घराचे खोदकाम करताना अर्धा किलो सोने सापडले असून ते मला विकायचे आहे, असे सांगितले. त्यावेळी व्यावसायिकाने मला काही नको, असे सांगितले. त्यावर गवंड्याने वारंवार फोन करून 5 लाख रूपयांची गरज असल्याचे सांगितले.
Monday, May 06, 2019 AT 08:47 PM (IST)
5कराड, दि. 25 ः मलकापूर येथे डी मार्ट मॉलसमोर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना वाहनाच्या धडकेत पादचारी जोतिराम रंगनाथ बुरसे (वय 70, रा. नांदगाव, ता. कराड) हे ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की, जोतिराम बुरसे हे सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास मलकापूर येथे डी मार्ट मॉलसमोरु महामार्ग ओलांडत होते. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. परिसरातील लोकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.
Tuesday, February 26, 2019 AT 08:53 PM (IST)
5फलटण, दि. 21 : राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, युवा नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम, शहरातील विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन, रक्तदान शिबिर, रुग्णांना फळेवाटप, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळेवाटप करून साजरा करण्यात आला. पुलवामा येथील शहीद जवान व अतिरेकी हल्ल्याची किनार असल्याने उत्साहापेक्षा सामाजिक बांधिलकीची जोड अधिक असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा परिषद  आणि जिल्हा नियोजन मंडळ सदस्या, सुविद्य पत्नी अ‍ॅड. सौ. जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी सकाळी रणजितसिंह यांचे औक्षण केले. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर माजी खासदार व प्रदेश काँग्रेेसचे उपाध्यक्ष हिंदुराव नाईक-निंबाळकर व सौ. मंदाकिनी नाईक-निंबाळकर या माता-पित्यांचे, काकी श्रीमती मंगलादेवी नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ बंधू समशेरसिंह नाईक-निंबाळकर, सौ. मनीषा नाईक-निंबाळकर, अच्युतराव खलाटे व थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतले.
Friday, February 22, 2019 AT 08:47 PM (IST)
तहसीलदारांच्या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले 5महाबळेश्‍वर, दि. 13 : येथील तहसीलदार मीनल कळसकर यांनी आदेशानुसार बेकायदेशीर बांधकामावर मोठी कारवाई करत महाबळेश्‍वर-पाचगणी रस्त्यावरील लिंगमाळा परिसरातील किंग गार्डन या आलिशान हॉटेलला टाळे ठोकले. तहसीलदारांच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर बांधकाम करून विना परवाना हॉटेल व्यवसाय करणारांचे धाबे दणाणले आहेत. पर्यटकांचे माहेरघर म्हणून महाबळेश्‍वर हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी सुमारे वीस लाख पर्यटक भेट देवून निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतात. पर्यटन हाच या ठिकाणच्या स्थानिक लोकांचा रोजगार. या स्थानिक लोकांना रोजगार मिळावा यासाठी न्याहरी व निवास ही योजना राज्य शासनाने सुरू केली. या योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतला आहे. देशातील अनेक धनिकांनी आपला काळा पैसा येथील जमीन खरेदीमध्ये गुंतविला व हॉटेल व्यवसाय सुरू केला. काही धनिकांनी स्थानिक ग्रामस्थांना हाताशी धरून भागीदारीत हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. हा व्यवसाय करताना अनेकांनी विनापरवाना बांधकामे केली आहेत. कोणताही परवाना न घेता हॉटेल व्यवसाय सुरू केले आहेत.
Thursday, February 14, 2019 AT 09:01 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: