Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 3
5फलटण, दि. 27 : येथील बी-बियाण्यांच्या दुकानातून खरेदी केलेले भेंडी बियाणे खराब लागल्याने झालेल्या नुकसानीमुळे खचलेल्या शेतकर्‍याने आत्महत्येचा इशारा दिल्याने बाजारपेठेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, गोरख लालासाहेब सस्ते, रा. निरगुडी, ता. फलटण यांनी ऑक्टोबर महिन्यात राशी कंपनीचे साहिबा हे भेंडी बियाणे प्रति किलो 2300 रुपये प्रमाणे चंद्रशेखर पवनलाल दोशी यांच्या दुकानातून दि. 12 ऑक्टोबर रोजी कॅश मेमो नंबर 2669 प्रमाणे 1 किलो खरेदी केल्याचे  दिसते. मात्र आपण प्रत्यक्षात दीड किलो  बियाणे खरेदी करुन 3450 रुपये दिले. मात्र पावती एक किलोचीच देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सदर बियाणे टोकन पध्दतीने शेतात लावले. मात्र त्याची उगवण झाली नसल्याने बियाणे, मजुरी व इतर खर्च वाया जाण्याबरोबरच भेंडीच्या पिकातून येणार्‍या उत्पन्नाचे मोठे नुकसान झाल्याने आपल्याला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी दि. 26 नोव्हेेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, शहर पोलीस ठाणे आदी ठिकाणी निवेदनाद्वारे केली.
Wednesday, November 28, 2018 AT 08:53 PM (IST)
5पाटण, दि. 2 : पाटण तालुक्याच्या मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पातील जलाशयात पाय घसरून पडल्यामुळे दिक्षी गावातील एका शेतकर्‍याचा बुडुन मृत्यू झाला. विष्णू विठ्ठल टोळे, वय- 50, रा. दिक्षी असे बुडालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की विष्णू टोळे हे नेहमीप्रमाणे गुरुवारी दुपारी दिक्षी गावानजीक असलेल्या मोरणा गुरेघर धरणाच्या जलाशयालगत पेरूच्या शिवारात बैल चारत होते. अचानकपणे बैल जलाशयाच्या पाण्यात  गेल्याने विष्णू टोळे हे बैलाला वाचविण्यासाठी पुढे सरसावले. मात्र त्यांचे दोन्ही पाय गवताळ जमिनीवरून घसरले. त्यामुळे ते देखील जलाशयात पडले. बैल पाण्याबाहेर निघाला. मात्र टोळे पाण्यात बुडाले. आसपास कोणीही नसल्याने टोळे यांना वाचविण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. बराच वेळ झाला तरी टोळे हे बैलासोबत दिसेनात म्हणून इतर लोकांनी त्यांच्या घरी जाऊन सांगितले. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी टोळे हे जलाशयात बुडाल्याचे समजले. शुक्रवारी सकाळी पाणबुड्यांच्या साह्याने  टोळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेची नोंद पाटण पोलिसात झाली आहे. या घटनेमुळे मोरणा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Saturday, November 03, 2018 AT 09:09 PM (IST)
निसरे फाटा येथील घटना 5पाटण, दि. 2 : कराड-चिपळूण या नवीन बांधण्यात येणार्‍या महामार्गावर पाटण तालुक्यातील निसरे फाटा येथे एका दुचाकीस्वाराला समोरून भरघाव वेगाने आलेल्या 407 टेम्पोने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मधुकर आत्माराम पवार (वय 45, रा. नावडी, वेताळवाडी) हा जागीच ठार झाला. दरम्यान, ही घटना शुक्रवारी उशिरा घडल्यामुळे या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्रात झाली नव्हती. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी पावणे सातच्या दरम्यान मधुकर आत्माराम पवार  हे कराड- चिपळूण महामार्गावरून आपल्या  दुचाकीवरून कराडकडून पाटणच्या दिशेने निघाले असता  कराडच्या दिशेने भरघाव वेगाने येणार्‍या 407 टेम्पोने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीस्वार मधुकर पवार हे जागीच ठार झाले. अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळी न थांबता गाडीसह  पोबारा केला. मात्र, प्रत्यक्षदर्शिंनी टेम्पोचा नंबर कराड पोलिसांना तातडीने कळविल्याने टेम्पो पकडण्यात पोलिसांना यश आले.
Saturday, November 03, 2018 AT 09:08 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: