Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 1
न्यायाधीशांच्या उपस्थितीत ‘इन कॅमेरा’ उत्तरीय तपासणी 5सांगली, दि. 10 (प्रतिनिधी) : आंबोली घाटात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळालेल्या अनिकेत कोथळे याच्या मृतदेहाचे विच्छेदन शुक्रवारी मिरजेतील शासकीय रुग्णालयात न्यायाधीशांच्या उपस्थितीत करण्यात आले. साडेचार तासांच्या या प्रक्रियेनंतर मृतदेह अ‍ॅनॉटॉमी आणि डीएनएसाठी पाठविण्यात आल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी सांगितले. दरम्यान, अनिकेतच्या नातेवाइकांशी संपर्क साधून पोलिसांनी मृतदेहातील काही अस्थी अंत्यसंस्कारासाठी देण्याची तयारी दर्शविली परंतु नातेवाइकांनी मृतदेह जेवढा आहे, तेवढा देण्याचा आग्रह धरला. त्यामुळे आता यापैकी नेमके काय करायचे, याचा निर्णय  सीआयडीचे अधिकारी घेतील, असे सांगण्यात आले. कोठडीत खून करून नराधम पोलीस गुन्हेगारांनी अनिकेत कोथळेचा मृतदेह आंबोलीच्या घाटात जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी चौथ्या दिवशीही उमटत राहिले. समाजातील विविध घटकांनी गुन्हेगार पोलिसांच्या कृत्याबाबत संताप व्यक्त करणे सुरू ठेवले आहे.
Saturday, November 11, 2017 AT 08:58 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: