Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 9
भारताची आफ्रिकेवर एक डाव, 202 धावांनी मात 5रांची, दि. 22 (वृत्तसंस्था) : टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाला ‘व्हाईटवॉश’ दिला. तिसर्‍या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 497 धावांवर आपला डाव घोषित केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर तर फॉलोऑन नंतरचा डाव 133 धावांवर संपला. त्यामुळे एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवत भारताने मालिका 3-0  अशा फरकाने जिंकली. पहिल्या डावातील अपयशामुळे दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर दुसर्‍या डावातही दक्षिण आफ्रिकेने खराब कामगिरी केली. डी कॉक, हामझा, बावुमा, हामझा आणि क्लासें या फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. सलामीवीर डीन एल्गर चांगला खेळत असताना त्याला चेंडू लागल्याने तो 16 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या जागी आलेला बदली खेळाडू डे ब्रून याने आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत आजचा पराभव उद्यावर ढकलला. पण चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला अणि अवघ्या काही मिनिटात खेळ संपला. डे ब्रून (30) आणि लुंगी एन्गीडी नदीमच्या सलग दोन चेंडूवर बाद झाले.
Wednesday, October 23, 2019 AT 08:31 PM (IST)
5विशाखापट्टणम, दि. 6 (वृत्तसंस्था) : भारताने कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्‍या डावात मोहम्मद शमी (5/35) आणि रवींद्र जडेजा (4/87) यांनी सर्वाधिक बळी मिळवत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्याच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 9 बळींची आवश्यकता होती. लय सापडलेल्या टीम इंडियाने दिवसाच्या दोन सत्रांमध्येच हा विजय आपल्या नावे केला. दिवसाच्या पहिल्याच सत्रात मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांच्या घातक फिरकी गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेचे 7 फलंदाज एक मागोमाग एक तंबूत धाडले. विजयासाठी केवळ दोनच बळी आवश्यक असताना भारताने दुसर्‍या सत्रात 22 षटके फेकत या सामन्यावर आपले नाव कोरले. या सामन्यात 8 बळी मिळवणारा रविचंद्रन अश्‍विनने सर्वात जलद बळी मिळवण्याच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी साधली. यापूर्वी शनिवारी भारताने आपल्या दुसर्‍या डावात रोहित शर्माच्या (127) दमदार शतकाच्या जोरावर 323/4 च्या धावसंख्येवर आपला डाव घोषित केला होता.
Monday, October 07, 2019 AT 08:56 PM (IST)
टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया अमेरिकेत 5फ्लोरीडा, दि. 1 (वृत्तसंस्था) ःविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 3 ऑगस्टपासून भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा सुरु होणार आहे. या दौर्‍यात भारत 3 टी-20, 3 वन-डे आणि 2 कसोटी सामने खेळेल. पहिले 2 टी-20 सामने हे अमेरिकेतल्या मियामी शहरात खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला आहे. विश्‍वचषकातून आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता भारतीय संघाच्या विंडीज दौर्‍यातील कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष असणार आहे.
Friday, August 02, 2019 AT 09:04 PM (IST)
5इंडोनेशिया, दि. 28 (वृत्तसंस्था) : इंडोनेशियातील लाबुआन भागात सुरु असलेल्या मानाच्या झीशीळवशपीं र्उीि स्पर्धेत भारताची सर्वोत्कृष्ट महिला बॉक्सर मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 51 किलो वजनी गटात मेरी कोमने आपल्या ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्धी एप्रिल फ्रेंक्सचा 5-0 च्या फरकाने पराभव केला. आगामी ऑलिम्पिक स्पर्धा लक्षात घेता, मेरी कोमने ठराविक स्पर्धांमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही मेरी सहभागी झाली नव्हती. मात्र 21 सप्टेंबरपासून सुरु होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेआधी सराव म्हणून मेरी कोमने झीशीळवशपीं र्उीि स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला, आणि आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मेरीने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
Monday, July 29, 2019 AT 09:01 PM (IST)
5मुंबई, दि. 21 (प्रतिनिधी) : वेस्ट इंडीज दौर्‍यातील टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची आज (रविवार) निवड करण्यात आली. तीनही मालिकांमध्ये विराट कोहली याच्याकडेच टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे आज निवड समितीची बैठक पार पडली. कर्णधार विराट कोहली हा देखील या बैठकीला उपस्थित होता. बैठकीनंतर दुपारी 2 च्या सुमारास पत्रकार परिषदेत नव्या संघाची घोषणा करण्यात आली. या दौर्‍यासाठी श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या, राहुल चहर, दीपक चहर, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, खलिल अहमद यांच्यासारख्या अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. माजी कर्णधार एम. एस. धोनी या दौर्‍यावर जाणार नसल्याचे त्याने यापूर्वीच निवड समितीला कळविले असल्यामुळे त्याच्याऐवजी ऋषभ पंत याला संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांना एकदिवसीय व टी-20 संघातून विश्रांती देण्यात आली आहे. केवळ कसोटी संघात बुमराहला स्थान देण्यात आले आहे.
Monday, July 22, 2019 AT 08:30 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: