Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  साप्ताहिक भविष्य (सूर्य रास)
मेष (मार्च २१ - एप्रिल २०)
कामात यश रवी सहावा. महत्वाच्या कामात यश मिळेल. रोजगाराची संधी कमी श्रमात मिळेल. मोठी कामे करण्याची क्षमता राहील. विवाह जुळतील. तुमचे कर्तृत्व सिध्द कराल. सप्ताहाची सुरुवात गाठीभेटी घेणे, पत्र व्यवहार, प्रवास इ. धावपळीत जाईल. एक दोन दिवस थकवा जाणवेल. घरगृहस्थीकडे लक्ष द्याल. संततीचा सहवास लाभेल. अनुकूल दिनांक : 7, 8.
वृषभ (एप्रिल २१ - मे २१)
संततीसाठी स्थावर इस्टेट रवी पाचवा. संततीसाठी स्थावर इस्टेट वगैरे काही तरी करण्याचा मानस किंवा तसा प्रयत्न राहील. मनाची कुचंबणा होईल. वैवाहिक जीवनात मनावर दडपण राहील. धंदा व्यवसाय चांगला चालेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी प्रयत्नशील रहाल. एक दोन दिवस कामासाठी खूप धावपळ होईल. सप्ताहाच्या शेवटी कुटुंबात दिलेली आश्वासने पाळाल. थकवा जाणवेल. अनुकूल दिनांक : 9, 10, 11.
मिथुन (मे २२ - जून २१)
मन उद्विग्न राहील रवी चवथा. गृहसौख्याची, धंदा व्यवसायाची काळजी राहील. नातेवाईकांच्या समस्यांचा उपद्रव तुम्हाला होईल. पती पत्नीत कटुता राहील. हौसमौज करता येईल. गुप्त शत्रू असतील. सप्ताहाच्या सुरुवातीला उत्साह चांगला राहील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. कुटुंबातील गरजा भागवू शकाल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक लाभासाठी खूप उलाढाली कराल. अनुकूल दिनांक : 7, 8, 12, 13.
कर्क (जून २२ - जुलै २२)
नवीन उपाययोजना कराल रवी तिसरा. धंदा व्यवसायाच्या विकासासाठी नवीन उपाययोजना कराल. गरोदर महिलांनी योग्य ती काळजी घ्यावी. कामे यशस्वी होतील. विवाह जुळतील. नवीन रोजगार मिळेल. सप्ताहाची सुरुवात खर्चिक, कंटाळवाणी, चिडचिडीने होईल. रेंगाळलेली कामे पुढील दोन दिवसात मोठ्या उत्साहाने पार पाडाल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. अनुकूल दिनांक : 9, 10, 11.
सिंह (जुलै २३ - ऑगस्ट २१)
आर्थिक प्राप्ती जेमतेम रवी दुसरा. आर्थिक प्राप्ती जेमतेम होईल. आध्यात्मिक वृत्ती वाढेल. तुमच्या कामाचा फायदा. तुमच्या संस्थेला जास्त होईल. कर्तृत्व सिध्द करण्यासाठी प्रयत्नशील रहाल. महिला ब्युटीपार्लरला भेट देतील. सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचा मोबदला मिळेल. एक दोन दिवस खर्चाचे कंटाळवाणे असतील. रेंगाळलेली कामे सप्ताहाच्या शेवटी मोठ्या उत्साहाने पूर्ण कराल. स्वभाव खर्चिक राहील. अनुकूल दिनांक : 7, 8, 12, 13.
कन्या (ऑगस्ट २२ - सप्टेंबर २३)
मानी व खर्चिक रवी तुमच्या राशीत. स्वभाव मानी व खर्चिक बनेल. मोठी कामे करू शकाल. हौसमौज करता येईल. विवाह जुळतील. दूरचे प्रवास घडतील. प्रतिष्ठा सांभाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला मानसन्मान लाभेल. कार्य- साफल्याचा आनंद मिळेल. कामाचा मोबदला मिळेल. करमणुकीत वेळ जाईल. सप्ताहाच्या शेवटी ऐश करण्याकडे प्रवृत्ती राहील. कामाचा कंटाळा कराल. अनुकूल दिनांक : 7, 8, 9, 10, 11.
तूळ (सप्टेंबर २४ - ऑक्टोबर २३)
आर्थिक अडचणी रवी बारावा. आर्थिक अडचणीत याल. विपरित घटनेतून लाभ संभवतो. कौटुंबिक समस्या व आजारपणासाठी खर्च होत राहील. एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहाल. सप्ताहात कामाचे नियोजन करा. त्याप्रमाणे त्याची अमलबजावणी करू शकाल. मानसन्मान लाभेल. सप्ताहाच्या शेवटी कामाचा मोबदला मिळेल. करमणुकीत वेळ घालवू शकाल. अनुकूल दिनांक : 9, 10, 11, 12, 13.
वृश्चिक (ऑक्टोबर २४ - नोव्हेंबर २२)
थोर व्यक्तींचे सान्निध्य रवी अकरावा. थोर व्यक्तींचे सान्निध्य लाभेल. नवीन मित्र होतील. गुंतवणुकीचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे. शेतीच्या कामासाठी खर्च होईल. मनमानी कराल. विवाह जुळतील. पण साडेसातीमुळे यशाची खात्री वाटणार नाही. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. चांगली बातमी समजेल. सप्ताहाच्या शेवटी मानसन्मान लाभेल. अनुकूल दिनांक : 12, 13.
धनु (नोव्हेंबर २३ - डिसेंबर २२)
राजकीय क्षेत्रात प्रभाव रवी दहावा. राजकीय क्षेत्रात प्रभाव वाढेल. खरेदी विक्रीचे व्यवहार वाढतील. जुने मित्र भेटतील. क्रोधावर व अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या कामाचे कौतुकही होऊ शकेल. सप्ताहाच्या सुरुवातीला इतरांच्या सहकार्याची आवश्यकता भासेल. एक दोन दिवस सर्दी थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी चांगली बातमी समजेल. जुने मित्र भेटतील. अनुकूल दिनांक : 7, 8.
मकर (डिसेंबर २३ - जानेवारी २०)
धंद्यातील पतप्रतिष्ठा वाढेल रवी नववा. धंद्यातील पतप्रतिष्ठा वाढेल. सामाजिक कार्यात रस घ्याल. वयोवृध्द अनुभवी व्यक्तींचा अनादर होऊ देऊ नका. विवाह जुळतील. कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. घर फ्लॅट होईल. नवीन रोजगार मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचा व्याप वाढेल. अपेक्षित सहकार्य उशिरा का होईना लाभेल. जवळचा प्रवास घडेल. सप्ताहाच्या शेवटी सर्दी, थकवा जाणवेल. अनुकूल दिनांक : 7, 8, 9, 10, 11.
कुंभ (जानेवारी २१ - फेबृवारी १९)
आर्थिक कोंडी रवी आठवा. आर्थिक कोंडी होईल. शारीरिक त्रास राहील. धंदा व्यवसायात अस्थिरता होईल. मुत्सद्दीपणा उपयोगी येईल. मोठ्या षडयंत्रापासून दूर रहा. वैवाहिक जीवनात त्रास संभवतो. प्रयत्न कमी पडतील. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीचा सहवास लाभेल. कामाचा व्याप वाढेल. मोबदला कमी मिळेल. अपेक्षित सहकार्य मिळविण्यावर तुमचे यश अवलंबून राहील. अनुकूल दिनांक : 9, 10, 11, 12, 13.
मीन (फेबृवारी २० - मार्च २०)
कामासाठी प्रवास रवी सातवा. कामासाठी प्रवास घडेल. बुध्दिकौशल्याने लाभ होईल. पती पत्नीत अहमपणा राहील. नातेवाईकांची सरबराई करावी लागेल. शारीरिक तक्रार राहू शकेल. सप्ताहाच्या सुरुवातीला थकवा जाणवेल. कामात शिथीलता येईल. संततीच्या सहवासाचा आनंद मिळेल. शिक्षणाची गोडी लागेल. सप्ताहाच्या शेवटी कामाचा व्याप वाढेल. मोबदला कमी मिळेल. वाद टाळा. अनुकूल दिनांक : 12, 13.
 
© Copyrights 2012 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: