Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भारतीय जनता पक्षाला केंद्रातली सत्ता मिळाल्यास, सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’ येतील अशी ग्वाही देणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 26 मे (आज) रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या तीन वर्षाच्या म्हणजे 1039 दिवसांच्या सरकारच्या कारकिर्दीत भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाबरोबरच, जनतेला दिलासा मिळालेले अनेक निर्णय अंमलात आले. माजी पंतप्रधान डॉ.

Friday, May 26, 2017 AT 11:28 AM (IST)

ग्रेट ब्रिटनमधल्या मँचेस्टर शहरात सुरू असलेल्या पॉप संगीताच्या कार्यक्रमात इसिसच्या आत्मघातकी दहशतवाद्यांनी घडवलेल्या शक्तिशाली बाँबस्फोटात 22 जण ठार आणि 59 जण जखमी झाल्याच्या घटनेने, या राष्ट्राला हादरा बसला आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातल्या विश्‍वव्यापार केंद्रावर विमाने धडकवून सप्टेंबर 2002 मध्ये अल् कायदाच्या दहशतवाद्यांनी घडवलेल्या महाहिंसाचाराच्या घटनेनंतर अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रांनीही दहशतवाद रोखायसाठी कडेकोट उपाययोजना अंमलात आणली.

Thursday, May 25, 2017 AT 11:47 AM (IST)

ग्रेट ब्रिटनमधल्या मँचेस्टर शहरात सुरू असलेल्या पॉप संगीताच्या कार्यक्रमात इसिसच्या आत्मघातकी दहशतवाद्यांनी घडवलेल्या शक्तिशाली बाँबस्फोटात 22 जण ठार आणि 59 जण जखमी झाल्याच्या घटनेने, या राष्ट्राला हादरा बसला आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातल्या विश्‍वव्यापार केंद्रावर विमाने धडकवून सप्टेंबर 2002 मध्ये अल् कायदाच्या दहशतवाद्यांनी घडवलेल्या महाहिंसाचाराच्या घटनेनंतर अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रांनीही दहशतवाद रोखायसाठी कडेकोट उपाययोजना अंमलात आणली.

Thursday, May 25, 2017 AT 11:45 AM (IST)

मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस यांच्या द्वेषाने पछाडलेल्या कर्नाटक सरकारने आता ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा कर्नाटकातल्या लोकप्रतिनिधींनी देणे हाही गुन्हा ठरवायची केलेली घोषणा, म्हणजे महाराष्ट्रद्वेषाचा कळस होय.

Wednesday, May 24, 2017 AT 11:35 AM (IST)

तांत्रिक आणि मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रातली उदासीनता, अनास्था संपवून संशोधन आणि नवनिर्मितीच्या आधारे साधलेले तंत्रज्ञान आत्मसात केल्याशिवाय भारताची चौफेर प्रगती होणार नाही, असे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत आणि जागतिक घडामोडीचे अभ्यासक संदीप वासलेकर यांनी परखडपणे व्यक्त केलेल्या मताचा गंभीर विचार सरकार आणि शिक्षण क्षेत्रातल्या धुरिणांनी करायला हवा.

Tuesday, May 23, 2017 AT 11:36 AM (IST)

येत्या 1 जुलैपासून अंमलात येणार्‍या जीएसटी (गुडस् अँड सर्व्हिसेस टॅक्स) मधून आरोग्य, शिक्षण, दूध, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू कराच्या जाळ्यातून वगळायचा निर्णय सर्व राज्यांच्या प्रतिनिधींच्या परिषदेत झाल्याने, सर्वसामान्य आणि गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे.

Monday, May 22, 2017 AT 11:32 AM (IST)

महसुली उत्पन्नात वाढ करण्यासाठी, मुद्रांक शुल्काचा वाढीव भुर्दंड लादून राज्य सरकारने महागाईच्या वणव्यात होरपळणार्‍या सर्वसामान्य जनतेची क्रूर विटंबना केली आहे. ही मुद्रांक शुल्क वाढ करताना, गोरगरिबांनाही ती परवडणार नाही, याचा विचारही सरकारने केलेला नाही. पती, पत्नी, भाऊ, बहीण असलेल्या कुटुंबीयांना किंवा पूर्वज-वंशजांना मालमत्ता बक्षिसपत्राने देण्यासाठी यापूर्वी अवघ्या पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क होते.

Friday, May 19, 2017 AT 11:27 AM (IST)

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने वारकरी आणि मराठी जनतेचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीतील विठूरायाची, बडव्यांच्या तावडीतून सुटका झाली असली तरी, आता सरकारने नेमलेल्या नव्या पुजार्‍यांच्या बडवेगिरीच्या छळाने भक्त मंडळी हैराण झाली आहेत. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना या मंदिराच्या पश्‍चिम दरवाजातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी सोडायला, तिथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस-पोलीस अधिकार्‍यांनी नकार दिला.

Thursday, May 18, 2017 AT 11:30 AM (IST)

मुक्त उदारमतवादी अर्थव्यवस्थेची धडाकेबाज अंमलबजावणी आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थांना मान्यता द्यायच्या धोरणामुळेच, महाराष्ट्रासह देशभरात प्राथमिक पूर्व ते प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षणाचा बाजार झाला.

Wednesday, May 17, 2017 AT 11:24 AM (IST)

चीन आणि पाकिस्तानला जोडणार्‍या ‘वन बेल्ट, वन रोड’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी चीनची राजधानी बिजिंगमध्ये झालेल्या परिषदेवर बहिष्कार घालून, भारताने चीनच्या वाढत्या विस्तारवादाला जाहीरपणे विरोध करीत, स्वीकारलेले आक्रमक धोरण चीनच्या धोरणाला काटशह देणारेच आहे. पाकिस्तानातील ग्वादार बंदराशी जोडणार्‍या महामार्गाची बांधणी सध्या चीनने वादग्रस्त असलेल्या गिलगिटच्या भागातून सुरू केली आहे.

Tuesday, May 16, 2017 AT 11:36 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: