Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
5मुंबई, दि. 1 (प्रतिनिधी) : राज्यातील वाहतूक नियम नवीन वर्षापासून अधिक कडक करण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला असून हेल्मेट सक्ती आता संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा फास अधिक आवळण्यात आला असून त्यांना पोलीस कारवाईबरोबरच तीन महिन्यांसाठी परवानाच गमावावा लागणार आहे.

Saturday, January 02, 2016 AT 11:12 AM (IST)

ई-निविदा न काढता कंत्राट : काँग्रेसचा आरोप 5मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : तीन लाख रुपयांवरील कामाचे कंत्राट केवळ ई-निविदेद्वारेच दिले जावे, हा आदेश बदलून जलशिवार योजनेची कोट्यवधी रुपयांची कंत्राटे वाटण्यात आली असून त्याची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. जलयुक्त शिवार योजना भ्रष्टाचाराचे ‘मलयुक्त शिवार’ बनले आहे, असा आरोप त्यांनी केला.

Friday, September 11, 2015 AT 11:13 AM (IST)

एकदा एका गृहस्थाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलाविले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठया मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते, ते पाहून मेणबत्तीला स्वत:चा अभिमान वाटला, आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली, "ज्या वेळी व ज्या ठिकाणी सूर्यचंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही. त्या वेळी व त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो, चंद्रसूर्यही माझ्यापुढेही क्षुद्र वाटतात.' तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली. त्यातला एक जण उठला.

Monday, January 06, 2014 AT 11:30 AM (IST)

एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला.

Saturday, January 04, 2014 AT 11:43 AM (IST)

एका डोंगरमाथ्यावर एक शेतकरी राहात होता. कडाक्याची थंडी पडली होती. बरेच दिवस तो शेतकरी बाहेर पडला नव्हता. झोपडीत होते तेवढे धान्य संपले. उपासमार होऊ नये म्हणून त्याने आपल्या एकेक मेंढीला कापून खाल्ले. मेंढया संपल्यानंतर बैल मारले. हे त्याचे कुत्रा रोज पहात होता. त्याने मनाशी विचार केला.

Friday, January 03, 2014 AT 11:23 AM (IST)

एका गावात चार ब्राह्मणपुत्र होते. त्यांची मोठी मैत्री होती. एकदा त्यांनी विचार केला. या गावात राहण्यात काही फायदा नाही. आपण दुसऱ्या देशाला जाऊन काहीतरी विद्या मिळविली पाहिजे. काही पाठांतर केले पाहिजे. मग विद्येच्या बळावर आपल्याला मान सन्मान, पैसा मिळेल. असा विचार करून ते चौघे प्रवासाला निघाले. एका गावातील पाठशाळेत जाऊन त्यांनी विद्याभ्यास सुरू केला. अनेक मंत्र पाठ केले. अध्ययन संपल्यावर ते आपल्या गावाकडे निघाले.

Thursday, January 02, 2014 AT 11:24 AM (IST)

एकदा दोन कोल्ह्यांनी कोंबड्याच्या खुराड्यात शिरण्याची एक युक्ती योजली व ती लगेच अंमलात आणली. खुराड्यात प्रवेश होताच कोंबड्या व त्यांची पिले यांना मारून खाण्याचा त्यांनी सपाटा चालविला. त्या कोह्यांपैकी एक कोल्हा तरुण व अविचारी होता. त्याचे मत असे झाले, की सगळ्या कोंबड्या लगेच मारून खाव्यात. दुसरा म्हातारा कोल्हा अनुभवी असल्याने त्याने असे ठरविले, की काही कोंबड्या दुसऱ्या दिवसाकरता राखून ठेवाव्यात.

Wednesday, January 01, 2014 AT 11:13 AM (IST)

एका पाथरवटाने देवाच्या सुंदर मूर्ती बनवल्या. विकण्यासाठी बाजारात न्याव्यात म्हणून त्याने आपल्या गाढवावर त्या मूर्ती लादल्या व तो बाजाराच्या दिशेने निघाला. दगडात कोरलेल्या त्या देवांच्या मूर्ती पाहून येणारे सहजच हात जोडून मूर्तींना नमस्कार करीत. पण नमस्कार त्या देवाच्या मूर्तींना आहे हे त्या मूर्ख गाढवाला कळले नाही. त्याला वाटे जो तो आपल्यालाच नमस्कार करतोय. त्यामुळे स्वत:ला कोणी तरी मोठा समजून गाढव एक पाऊलही पुढे टाकीना.

Tuesday, December 31, 2013 AT 11:22 AM (IST)

एक संत माणूस मेल्यानंतर स्वर्गात गेला. तेथे सर्व देवांची सभा भरली होती. त्याने सर्व देवांना नमस्कार केला पण कुबेराला मात्र त्याने नमस्कार केला नाही. हे पाहून देवांचा राजा इंद्र याने त्याला विचारले, "हे पुण्यात्मा तू कुबेराला का नमस्कार केला नाहीस? त्यावर तो संत पुरुष म्हणाला, "अहो, देवाधिदेवांनो हा कुबेर मोठा अन्यायी आहे. याने पृथ्वीवर संपत्तीचे वाटप करताना कोणाला भरपूर धन दिले तर कुणाला थोडे, तर कुणाला अजिबात नाही.

Monday, December 30, 2013 AT 11:46 AM (IST)

एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पळून जाऊ लागला. त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाणा पाळला होता.

Saturday, December 28, 2013 AT 11:51 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: