Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  प्रमुख वार्ता

दहशतवाद्यांकडून तीन पोलिसांचे अपहरण व हत्या 5श्रीनगर, दि. 21 (वृत्तसंस्था) : दहशतवाद्यांनी गुरुवारी रात्री अपहरण केलेल्या तीन पोलिसांची हत्या केल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात लष्कराने सुरू केलेल्या शोधमोहिमेचे रूपांतर चकमकीत झाले. शोकबाबा येथे झालेल्या या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. सुरक्षा दलांनी गुरुवारीदेखील दोन दहशतवाद्यांना ठार केले होते.

Saturday, September 22, 2018 AT 11:17 AM (IST)

5मुंबई, दि. 21 (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स दुपारच्या सत्रात तब्बल 1100 अंकांनी घसरला. अर्थात, थोड्याच वेळाने तो सावरून सुमारे 900 अंकांनी वधारला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येही आज 367 अंकांची घसरण झाली होती. मात्र, हा निर्देशांकही दिवसअखेरीस बर्‍यापैकी सावरला. सेन्सेक्स 36,841 अंकांवर तर निफ्टी 11,143 अंकांवर बंद झाला.

Saturday, September 22, 2018 AT 11:14 AM (IST)

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम 5मुंबई, दि. 21 (वृत्तसंस्था) : गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बी वाजवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने घातलेली बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे यंदाही गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट होणार नाही. ध्वनिप्रदूषण होत असल्याने न्यायालयाने डीजेला परवानगी नाकारताना डॉल्बीमालकांची संघटना ‘पाला’ची याचिका फेटाळली.

Saturday, September 22, 2018 AT 11:08 AM (IST)

चार गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांचा समावेश चौघांना अटक 5सातारा, दि. 21 : सातार्‍यात बिहार येथून आणलेला शस्त्राचा मोठा साठा पकडण्याची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली. या पथकाने एकाचवेळी तब्बल 4 गावठी पिस्तूल, 3 जिवंत राऊंड जप्त  करुन चौघांना अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, गेल्या महिन्याभरात सातारा पोलीस दलाच्यावतीने एकूण 8 पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.

Saturday, September 22, 2018 AT 11:04 AM (IST)

5फलटण/कण्हेर, दि. 20 : फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथील चंद्रकांत दशरथ चव्हाण (वय 46) आणि बेबलेवाडी, ता. सातारा येथील शेतकरी तानाजी ज्योती मोरे (वय 70) या दोघांचा स्वाईन फ्ल्यूने गुरुवारी मृत्यू झाला. चव्हाण यांच्यावर पुणे येथे तर मोरे यांच्यावर सातार्‍यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तानाजी मोरे हे शेतकरी तर चंद्रकांत चव्हाण हे आपल्या टेम्पोतून भाजीपाला व अन्य शेतमाल वाहतुकीचा व्यवसाय करत होते.

Friday, September 21, 2018 AT 10:53 AM (IST)

दोन मित्रांवर गुन्हा एक संशयित सैन्यदलातील 5सातारा, दि. 20 : यवतेश्‍वर-कास रस्त्यावरील गणेशखिंडीच्या अडीचशे फूट खोल दरीत ढकलून देवून मनीष शिवाजी लाड (वय 28, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) याचा खून  त्याच्या दोन मित्रांनीच केल्याचे स्पष्ट झाले आहे. या  प्रकरणी सागर सुनील दळवी (रा. यादोगोपाळ पेठ) व वैभव इंगवले (रा. विकासनगर, खेड) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांपैकी वैभव इंगवले हा सैन्य दलात जवान असल्याची माहिती समोर आली आहे.

Friday, September 21, 2018 AT 10:52 AM (IST)

उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला 5मुंबई, दि. 19 (वृत्तसंस्था) : गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीच्या वापराला परवानगी द्यावी आणि त्यावर घातलेली बंदी उठवावी यासाठी दाखल झालेल्या याचिकेवरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना दिलासा मिळाला नाही. दरम्यान, या बंदीवर राज्य सरकार ठाम असल्याचेही स्पष्टझाले आहे.

Thursday, September 20, 2018 AT 10:50 AM (IST)

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 5मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी असलेली सहा महिन्यांची मुदत एक वर्षाची करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सरकार याबाबतचा अध्यादेश लवकरच काढणार आहे. हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच 7 एप्रिल 2015 पासून लागू करण्यात येणार आहे.

Wednesday, September 19, 2018 AT 11:00 AM (IST)

पोलिसांकडून नोटिसा दोन दिवसांत निर्णय होणार 5सातारा, दि. 18 : आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापनावरून सातार्‍यात गेल्या वर्षी 5 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री झालेल्या ‘सुरुची राडा’ प्रकरणातील 55 संशयितांवर तात्पुरत्या तडीपारीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी तडीपारीच्या कारवाया सुरू केल्या आहेत.

Wednesday, September 19, 2018 AT 10:59 AM (IST)

5पुणे, दि. 17 : हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचे सोमवारी पुणे येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. आंदळकर यांच्या निधनाने भारतीय कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांची प्रकृती वयोमानामुळे गेल्या काही काळापासून खालावली होती. त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात नेले जायचे. मात्र, आज अचानक आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.

Tuesday, September 18, 2018 AT 02:13 PM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: