Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  राष्ट्रीय वार्ता

5श्रीनगर, दि. 25 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे डीपीएस शाळेत रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. या चकमकीत भारतीय लष्कराचे तीन जवानही जखमी झाले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनावर श्रीनगरमधील पंथा चौकात हल्ला केल्यानंतर या दहशतवाद्यांनी शाळेत आश्रय घेतला होता.  पंथा चौकातील हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांच्या शोधार्थ मोहीम उघडली होती.

Monday, June 26, 2017 AT 11:31 AM (IST)

5श्रीनगर, दि. 21 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील सोपोर भागात सुरक्षा दलांनी बुधवारी दोन दहशतवाद्यांना ठार केले. या दहशतवाद्यांकडून दोन शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. या भागात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने तेथे शोधमोहीम सुरू आहे.

Thursday, June 22, 2017 AT 11:21 AM (IST)

कोलकाता येथील तुरुंगात रवानगी 5नवी दिल्ली, दि. 21 (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सहा महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आलेले कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सी. एस. कर्नन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला. कर्नन यांची कोलकाता येथील प्रेसीडेन्सी तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

Thursday, June 22, 2017 AT 11:17 AM (IST)

विरोधी पक्षांच्या एकजुटीला दणका 5नवी दिल्ली/पाटणा, दि. 21 (वृत्तसंस्था) : भाजपप्रणित रालोआचे राष्ट्रपतिपदाचे उमदेवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याचा निर्णय बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीतील संयुक्त जनता दलाने बुधवारी घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी एकजुटीने उमेदवार उभा करण्याच्या विरोधी पक्षांच्या प्रयत्नांना मोठा दणका बसला आहे.

Thursday, June 22, 2017 AT 11:15 AM (IST)

5श्रीनगर, दि. 20 (वृत्तसंस्था) : उत्तर काश्मीरमध्ये काही दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल माहिती मिळाल्याने सोपोर भागात सुरक्षा दलांनी मंगळवारी सायंकाळपासून शोधमोहीम सुरू केली आहे.

Wednesday, June 21, 2017 AT 11:33 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: