Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  खेळ वार्ता

टीम इंडियाचा अनोखा विश्‍वविक्रम 5पोर्ट ऑफ स्पेन, दि. 26 (वृत्तसंस्था) : यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात खेळताना भारतीय संघाने अनोखा विश्‍वविक्रम रचला आहे. विंडीजविरुद्ध अजिंक्य रहाणेचे शतक, कर्णधार विराट कोहलीची 87 धावांची धुवाँधार खेळी आणि शिखर धवनचे अर्धशतक यांच्या जोरावर भारताने रविवारी 5 बाद 310 अशी धावसंख्या रचताना या विश्‍वविक्रमाला गवसणी घातली.

Tuesday, June 27, 2017 AT 11:07 AM (IST)

मुख्य प्रशिक्षकाविना खेळणार 5पोर्ट ऑफ स्पेन, दि. 22 (वृत्तसंस्था) : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या ंअंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून झालेला मानहानिकारक पराभव आणि कर्णधार विराट कोहलीसोबत झालेल्या  वादातून मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी दिलेला राजीनामा या पार्श्‍वभूमीवर वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका आणि एकमेव ट्वेंटी-20 सामन्यासाठी कॅरेबियन भूमीत उतरलेल्या टीम इंडियाला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

Friday, June 23, 2017 AT 11:58 AM (IST)

5लंडन, दि. 20 (वृत्त- संस्था) : कर्णधार विराट कोहली-सोबत असलेले मतभेद विकोपाला गेल्याने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एका यशस्वी कारकिर्दीची कडवट अखेर झाली आहे. कुंबळे यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला बीसीसीआयने दुजोरा दिला आहे.

Wednesday, June 21, 2017 AT 11:44 AM (IST)

भारत-पाक दहा वर्षांनी फायनलमध्ये आमनेसामने 5लंडन, दि. 16 (वृत्तसंस्था) : सारे क्रिकेट विश्‍व ज्या सामन्याची दीर्घ काळापासून प्रतीक्षा करत आहे, ज्या दोन प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्यांना अ‍ॅशेस किंवा आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेतील अंतिम सामन्यापेक्षा अधिक महत्त्व असते, त्या भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील अंतिम सामना चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत येत्या रविवारी (दि. 18) होणार आहे.

Saturday, June 17, 2017 AT 11:36 AM (IST)

5कार्डिफ, दि. 14 (वृत्तसंस्था) : भारताविरुद्धच्या पराभवातून सावरत दक्षिण आफ्रिका व श्रीलंका यांना धूळ चारत उपांत्य फेरी गाठणार्‍या पाकिस्तानने यजमान इंग्लंडचाही धुव्वा उडवून चॅम्पियन्स करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. कार्डिफ येथे खेळवण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडवर 8 गडी राखून मात केली. इंग्लंडने दिलेले 212 धावांचे आव्हान पाकिस्तानने दोन गडी गमावून आणि तब्बल 12.5 षटके राखून लीलया पार केले.

Thursday, June 15, 2017 AT 11:38 AM (IST)

5कार्डिफ, दि. 14 (वृत्तसंस्था) : भारताविरुद्धच्या पराभवातून सावरत दक्षिण आफ्रिका व श्रीलंका यांना धूळ चारत उपांत्य फेरी गाठणार्‍या पाकिस्तानने यजमान इंग्लंडचाही धुव्वा उडवून चॅम्पियन्स करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. कार्डिफ येथे खेळवण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडवर 8 गडी राखून मात केली. इंग्लंडने दिलेले 212 धावांचे आव्हान पाकिस्तानने दोन गडी गमावून आणि तब्बल 12.5 षटके राखून लीलया पार केले.

Thursday, June 15, 2017 AT 11:36 AM (IST)

5बर्मिंगहॅम, दि. 14 (वृत्तसंस्था) : गटसाखळी सामन्यांमध्ये कामगिरीत चढ-उतार राहिलेल्या भारतीय क्रिकेट संघासमोर उद्या (गुरुवार) चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत एजबॅस्टन मैदानावर धोकादायक बांगलादेशचे आव्हान आहे. या स्पर्धेतील सर्वात कमकुवत संघ मानल्या जाणार्‍या आपल्या शेजारी देशाच्या संघाविरुद्ध भारताचे पारडे जड असले तरी क्रिकेट हा सर्वात अनिश्‍चितता असलेला खेळ आहे.

Thursday, June 15, 2017 AT 11:33 AM (IST)

5कार्डिफ, दि. 12 (वृत्तसंस्था) : कर्णधार सर्फराज अहमदचे अर्धशतक आणि तळाच्या मोहम्मद आमीरची चिवट फलंदाजी यांच्या जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेवर तीन गडी राखून थरारक विजय मिळवत चॅम्पियन्स करंडक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ‘ब’ गटातील या दोन संघांच्या साखळी सामन्यात पारडे सतत दोलायमान होते. अखेर पाकिस्तानने चिवट खेळी करून विजय मिळवला.

Tuesday, June 13, 2017 AT 11:30 AM (IST)

दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरले ‘चोकर्स’ 5लंडन, दि. 11 (वृत्तसंस्था) : श्रीलंकेकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर कात टाकलेल्या भारतीय संघाने गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व फलंदाजी या तिन्ही क्षेत्रांमध्ये सरस कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून चॅम्पियन्स करंडक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

Monday, June 12, 2017 AT 11:36 AM (IST)

बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान कायम 5 कार्डिफ, दि. 9 (वृत्तसंस्था) : अष्टपैलू शाकिब-अल-हसन आणि माजी कर्णधार महमदुल्ला या दोघांनीही शतके झळकवताना पाचव्या विकेटसाठी केलेल्या 224 धावांच्या विक्रमी भागीदारीमुळे बांगलादेशने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या ‘अ’ गटात बलाढ्य न्यूझीलंडवर पाच गडी आणि 16 चेंडू राखून सनसनाटी विजय मिळवला.

Saturday, June 10, 2017 AT 11:31 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: