Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
प्राचीन काळापासून शनी हा आपल्या कड्यांमुळे आगळावेगळा आणि आकर्षणाचा विषय ठरलेला ग्रह आहे. यासाठीच वीस वर्षांपूर्वी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांनी संयुक्तपणे कॅसिनी हे अवकाशयान सोडले. तब्बल 13 वर्षं शनीच्या कक्षेत फिरत राहिलेले हे अवकाशयान आता नष्ट करण्याची वेळ आली आहे त्यासाठी ते शनीवर कोसळावे लागेल.

Friday, May 26, 2017 AT 11:29 AM (IST)

अलीकडे झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पंजाब वगळता अन्य राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली. आता पुढील काही महिन्यांमध्ये होणार्‍या निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. त्यातील तीन राज्ये भाजपच्या तर दोन राज्ये काँग्रेसच्या ताब्यात आहेत गुजरातमध्ये डिसेंबर 2017 मध्ये विधानसभा निवडणूक प्रस्तावित आहे.

Thursday, May 25, 2017 AT 11:48 AM (IST)

सीबीआयने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम तसंच त्यांचा मुलगा कार्ती यांच्या घरांवर छापे टाकले. एअरसेल मॅक्सिस या उद्योग समूहाला परवानगी दिल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे चिदंबरम चांगलेच अडचणीत आले असून काँग्रेसलाही हादरा बसला आहे.

Wednesday, May 24, 2017 AT 11:36 AM (IST)

  देशभरात दि. 1 जुलै- पासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे. जीएसटीमुळे जकात कर व एलबीटी रद्द करून त्याऐवजी महापालिकांनी कायमस्वरुपी अनुदान देण्याची तरतूद असणारे विधेयक पास करण्यात आले तब्बल एक तपाच्या समुद्र मंथनानंतर अखेर देशात वस्तू आणि सेवा करप्रणाली (जीएसटी) लागू होणार असून त्याची जोरदार तयारी सर्वत्र सुरू आहे.

Monday, May 22, 2017 AT 11:34 AM (IST)

रिमाचे आकस्मिक निधन ही दुखद बातमी आहे. तिची उत्साही, चौकस आणि विचारी प्रतिमा डोळ्यासमोर तरळत आहे. बर्‍याच कलाकृतींमधून आम्ही एकत्र काम केले. सहकलाकाराला समजून घेण्याचे कौशल्य मी जवळून अनुभवले आहे. नवीन पिढीला प्रोत्साहन देण्यात ती कधीच मागे राहिली नाही. माध्यमांच्या गरजेप्रमाणे अभिनयशैली बदलण्याची कला तिला अवगत होती. रिमाचे निधन चटका लावून गेले आहे रिमा लागू या चतुरस्त्र अभिनेत्रीचे आकस्मिक निधन ही एक धक्कादायक आहे.

Friday, May 19, 2017 AT 11:28 AM (IST)

बँकांची कर्ज चुकवणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने अध्यादेश काढला आहे. यामुळे कर्ज चुकवेगिरीला आळा बसेल असा सरकारचा दावा आहे. परंतु प्रत्यक्षात या तरतुदी पोकळ असून त्यामुळे फारसे काही साध्य होण्याची चिन्हे नाहीत.

Thursday, May 18, 2017 AT 11:32 AM (IST)

भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनातून जन्मलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावरील भ्रष्टाचाराचा आरोप खळबळ निर्माण करणारा ठरला. ‘आप’च्या विविध मंत्र्यांवरील आरोप, विश्‍वासू साथीदारांनी सोडलेली साथ, शुंगलू समितीचा अहवाल, अंतर्गत संघर्ष यामुळे अगोदरच आपचे सरकार अडचणीत आले आहे.

Wednesday, May 17, 2017 AT 11:25 AM (IST)

फ्रान्समध्ये 42 वर्षांनंतर प्रथमच डावे व रिपब्लिकन पक्ष अध्यक्षपदाच्या शर्यतीत नव्हते. निवडणुकीतील पहिल्या फेरीपर्यंत फ्रान्समध्येही उजव्या विचारसरणीच्या पक्षाकडे सत्ता जाते, की काय अशी शंका येत होती. परंतु, जनतेने सर्वसमावेशक आणि उदारमतवादी नेत्यांच्या हाती सत्ता देऊन आपले वेगळेपण जपले. फ्रान्सच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे इमॅन्युअल मॅकराँ यांची निवड झाली आहे जगभर उजव्या विचारांच्या व्यक्तींच्या हाती सत्ता देण्याचा कल आहे.

Tuesday, May 16, 2017 AT 11:37 AM (IST)

  शेतकर्‍यांकडे अद्यापही लाखो क्विंटल तूर शिल्लक असतानाही, अचानक ही खरेदी थांबवली गेल्याने, हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा द्यायच्या ऐवजी त्यांच्या जखमांवर असंवेदनशील भाषेत मीठ चोळायचा उद्योग भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केल्याने, त्यांच्या विरोधात राज्यभरात असंतोषाचा वणवा पेटला आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांसंदर्भात केलेल्या बेताल वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमट ...

Monday, May 15, 2017 AT 11:31 AM (IST)

दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी रात्री चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराने देश हादरला होता. संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावणार्‍या या घटनेनंतर लैंगिक अत्याचारासंबंधीचे कायदे अधिक कडक करण्यात आले. तरीही देशात बलात्काराच्या घटना वाढत आहेत.

Friday, May 12, 2017 AT 11:13 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: