Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  स्थानिक वार्ता

5सातारा, दि. 17 : शाहूनगर, जगतापवाडी परिसरात ड्रेनेजची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ओढ्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. तसेच शिवनेरी कॉलनी व इतर परिसराची पाहणी करून, आराखडा तयार करून या ठिकाणी आमदार फंड, खासदार फंड अथवा अन्य बसेल त्या योजनेतून गटारे बांधण्याचा निर्णय कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

Thursday, December 18, 2014 AT 11:17 AM (IST)

श्रमिक मुक्ती दलाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 5सातारा, दि. 15 : दुष्काळग्रस्त परिसराला सिंचनाचा लाभ देऊन दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी निधी देऊन त्या योजनांचे पाणी प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यबद्ध कार्यक्रम आखावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना दिले.

Tuesday, December 16, 2014 AT 11:08 AM (IST)

5सातारा, दि. 15 : प्रवेशद्वारापासून बालकांच्या झांजपथकाच्या गजरात झालेले स्वागत, संस्थेतील बालकांसह उपस्थित सर्वांचाच अपूर्व उत्साह आणि "हॅपी बर्थडे टू यू' या गीताला सर्वांनीच दिलेली साथ अशा वातावरणात जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांचा वाढदिवस येथील निरीक्षणगृह व बालगृहात उत्साहात साजरा करण्यात आला.

Tuesday, December 16, 2014 AT 11:06 AM (IST)

भूमच्या गटशिक्षणाधिकारी महिलेवर गुन्हा दाखल 5सातारा, दि. 15 : "व्हॉटस्‌ऍप'वर आक्षेपार्ह मजकूर टाकून साताऱ्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण वसंत अहिरे (वय 38, रा. जिल्हा परिषद अधिकारी निवासस्थान, सदरबझार) यांची बदनामी केल्या प्रकरणी भूम पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे (भूम, जि. उस्मानाबाद) यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Tuesday, December 16, 2014 AT 11:00 AM (IST)

5साातारा,  दि. 11 : सहा महिन्यांपूर्वी पित्यानेच दोन लहान मुलींना आईस्क्रिम मधून विष देऊन खून करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये मुलगी समीक्षा दिनेश सुतार (वय 4) हिचा मृत्यू झाला तर समृद्धी दिनेश सुतार (वय 8) व दिनेश चंद्रकांत सुतार ( वय 35, रा. वाढे फाटा, सातारा) हे वाचले होते. या प्रकरणात दिनेश सुतार याला मुलीचा खून केल्या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. पी.

Friday, December 12, 2014 AT 11:06 AM (IST)

5साातारा, दि. 11 : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आणि सातारा नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक सुनील उर्फ बापू सदाशिव मेळवणे यांचे वयाच्या 40 व्या वर्षी गुरूवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि बंधू असा परिवार आहे. शहरात ते बापू या नावाने परिचित होते. राजपथावरील महाराष्ट्र कोल्ड्रिंकचे ते मालक होत. ते विजय चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य आणि  विजय गणेशोत्सव  मंडळाचे आधारस्तंभ होते. खा.

Friday, December 12, 2014 AT 11:04 AM (IST)

आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा  5सातारा, दि.10 : आयटीआयच्या परीक्षा प्रणालीमध्ये नकारात्मक गुण पद्धत सुरू करण्यात आल्यामुळे राज्यात 80 टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यामुळे ही पद्धत बंद करावी, नापास विद्यार्थ्यांबाबत निर्णय घेऊन त्यांना तत्काळ न्याय द्यावा, प्रश्नपत्रिका इंग्रजी ऐवजी मराठीतून घ्याव्यात आदी मागण्यांसाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

Thursday, December 11, 2014 AT 11:10 AM (IST)

5सातारा, दि.10 : ध्वजदिनी निधी संकलनात नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेऊन अधिकाधिक  निधी संकलन करावे व या राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज केले. दरम्यान, या कार्यक्रमात माजी सैनिक व सातारचे माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी ते बोलत होते.

Thursday, December 11, 2014 AT 11:09 AM (IST)

5सातारा, दि. 10 : राधिका रोड, सातारा येथील पर्ल्स कार्यालयातील संचालक, एजंट व कामगार अशा एकूण सात जणांवर बुधवारी रात्री उशिरा शाहूपुरी पोलीस ठाण्यात 3 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पर्ल्स कंपनीचे व्यवस्थापक व संचालक तरलोचन सिंग, सुखदेव सिंग, गुरुमित सिंग, सभ्रता भट्टाचार्य, प्रेमजीत कांडा (सर्व रा.

Thursday, December 11, 2014 AT 11:02 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: