Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कृतज्ञतेचा विकास तेव्हा होतो, जेव्हा आम्हाला प्राप्त झालेले सर्व उपहार आणि देणग्यांची आम्ही आठवण करतो. आम्ही प्रभूच्या भौतिक देणग्यांपासून सुरू करू शकतो. सूर्य दररोज उगवतो, जगाला प्रकाशित करण्यासाठी, ज्यामुळे आम्ही पाहू शकू. सूर्य आम्हाला उष्णता प्रदान करतो. तो झाडाझुडुपांना पोषण देतो ज्यामुळे ते आम्हाला भोजन देऊ शकतात. प्रभूने आम्हाला प्रकृती दिली आहे, जी खाण्यासाठी भोजन आणि पिण्यासाठी पाणी देते.

Wednesday, May 22, 2013 AT 11:44 AM (IST)

असे लोक असतात की, जे खूप पीडा सहन करतात. परंतु तरीही कृतज्ञ राहतात आणि ज्या दिवशी ते पीडेतून मुक्त होतात, ते प्रभुचे आभार मानतात. जर आम्हाला काही शारीरिक पीडा आली आणि त्या दुखण्याबरोबर आम्हाला जगावे लागत असेल तरीही आम्ही जीवनात ते करू शकतो. जसे सकाळी उठून कामावर जाणे असो किंवा जीवनातील काही क्षणांचा आनंद घेणे असो, त्या करता आम्ही प्रभुचे धन्यवाद केले पाहिजेत.

Monday, May 20, 2013 AT 11:50 AM (IST)

महान महिला संत, राबिया बसरी यांचा एक मित्र डोक्याला पट्टी बांधून त्यांच्याकडे आला. जेव्हा त्याने त्या पीडेत प्रभूला पुकारले, तेव्हा त्यांनी (बसरींनी) त्याला विचारले की त्याला काय त्रास होत आहे. तो म्हणाला त्याचे डोके खूप दुखत आहे. त्या म्हणाल्या, "किती दिवसांपासून तुला डोकेदुखीचा त्रास होतो आहे?' तो म्हणाला एक दिवसापासून.

Saturday, May 18, 2013 AT 11:28 AM (IST)

आम्ही त्या अनेक गोष्टींची गणना का करू नये ज्या प्राप्त झाल्या आहेत? त्याकरिता आम्ही प्रभूचे आभार मानायला हवेत. सर्वात पहिली भाग्याची गोष्ट ही की, आम्हास मनुष्य योनी प्राप्त झाली. जर आम्ही अन्य योन्यांवर दृष्टी टाकली तर आम्हाला समजेल की, त्यांचे जीवन किती असह्य आहे. त्यांना प्राकृतिक विपत्तीपासून वाचण्याकरिता आश्रय शोधावा लागतो आणि ते कायम (निरंतर) शिकाऱ्यांच्या भयाने ग्रस्त असतात.

Friday, May 17, 2013 AT 11:31 AM (IST)

जेव्हा आम्ही पात्र होतो, एक प्रबळ इच्छा ठेवतो आणि प्रेमाने जगतो तेव्हा शाश्वत ज्वाला आमच्या अंतरी प्रज्वलित असते. ती अधिक धगधगीतही करता येऊ शकते, जेव्हा आम्ही प्रभु प्रति आभार प्रकट करतो. कृतज्ञता एक अन्य उपहार (भेट) आहे, जी प्रभू आमच्या  आध्यात्मिक प्रगती करता देतात.

Thursday, May 16, 2013 AT 11:38 AM (IST)

एका वेळी रामकृष्ण परमहंस यांनी एका शिष्यास विचारले, "प्रभू परमानंदाचे एक सरोवर आहे, काय तुम्ही यात सूर मारू इच्छिता.

Wednesday, May 15, 2013 AT 11:30 AM (IST)

प्रभूसोबत पोहताना आमच्याकडे सर्व काही असते व आम्ही संतुष्ट असतो. प्रभूसोबत पोहण्यामुळे प्राप्त होणाऱ्या प्रसन्नतेशी स्पर्धा करू शकेल असे या जगात काहीच नसते. आमच्या आत्म्याचे अंतरंग आमचे संपूर्ण अस्तित्व प्रभूच्या दिव्य प्रेमाने आणि अलिंगनाने आनंदविभोर होते. मग कोणी कशाला स्वत:ला या आश्चर्यकारक अशा प्रेमाच्या सागरापासून विलग करण्याचा विचार करेल? कोणतीही सांसारिक इच्छा आपणास त्या आनंदापासून अलिप्त करू शकत नाही.

Tuesday, May 14, 2013 AT 11:23 AM (IST)

आमचे मन इच्छांनी भरपूर असल्याने ते आम्हास काम, क्रोध, लोभ, मोह व अहंकारामध्ये अडकविते. हेच कारण आहे ज्यामुळे सरोवर मलीन होते आणि आम्ही अनेक अडचणींनी घेरले जाऊन आमचे जीवन तणावपूर्ण बनते. मनाबरोबर पोहण्याऐवजी जर आम्ही प्रभूबरोबर पोहलो तर आम्ही संतुष्ट होवू. जेव्हा आपल्या अहंकारास सोडून प्रभूशी प्रेम करू लागतो तेव्हा आम्ही त्याच्यासारखे होऊन प्रेमामध्ये बुडून जाऊन स्वत:ला विसरतो व प्रभूशी एकरूप होतो.

Monday, May 13, 2013 AT 01:02 PM (IST)

ह्या जगात असे काहीही नाही की, ज्याने आपले समाधान होईल हे शिष्य जाणून असतो. जगात कायमस्वरूपी नशा देणारे असे काहीच नाही. सुखाच्या प्राप्तीसाठी शिष्याने पूर्ण धरतीचा शोध घेतला आणि त्यात तो निराश झाला. शिष्य हे जाणतो की, केवळ दिव्य प्रेमातच कायम स्वरूपाचे सुख विराजमान आहे. तेव्हा शिष्य सदगुरुंची सोबत प्राप्त करू इच्छितो तेथेच तो आशेचा किरण पाहतो आणि जगातील दु:खापासून सुटतो.

Saturday, May 11, 2013 AT 11:40 AM (IST)

प्रभूमध्ये लीनव प्रेमाने परिपूर्ण असणाऱ्यांच्या संगतीत केवळ प्रभुप्रेमाचीच चर्चा होते. तेथे फक्त करुणेचाच संचार असतो. जेव्हा एखादा सदगुरूंच्या संगतीत येतो तेव्हा तो केवळ प्रेमाच्या जगाचा अनुभव प्राप्त करू इच्छितो, मनुष्यास जगामध्ये जाण्यासाठी त्या अनेक सुसंध्या प्राप्त होतात. लोक येथे सदगुरूंच्या सहवासात (संगतीत) शांतीचा अनुभव घेण्यासाठी येतात. ते येथे गप्पा करायला येत नाहीत.

Friday, May 10, 2013 AT 11:21 AM (IST)

© Copyrights 2013 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: