Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  विभागीय वार्ता

5कराड, दि. 15 : खोडशी, ता. कराड येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत आठ एकरातील उसाच्या क्षेत्रास गुरुवारी दुपारी आग लागून 10 ते 12 शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेला वीज कंपनी जबाबदार असल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे. खोडशी, मुंढे, विजयनगर परिसरात उसाला आग लागल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. खोडशी येथे गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास उसाला आग लागली.

Friday, November 16, 2018 AT 11:55 AM (IST)

दगड, विटा मारल्याने चार पोलीस जखमी आठ जणांना अटक 5फलटण, दि. 15 : कुंभारटेक, गोसावी वस्ती, मलठण (फलटण) येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी बुधवारी (दि. 14) रात्री 8.40 च्या सुमारास गेलेल्या पोलीस कर्मचार्‍यांवर दगड, विटा फेकून त्यांना जखमी केले आणि शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून 13 जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Friday, November 16, 2018 AT 11:54 AM (IST)

महाबळेश्‍वरमधील दुर्घटना एक कामगार बचावला 5महाबळेश्‍वर, दि. 15 : येथून दोन कि.मी. अंतरावरील रांजणवाडी मोहल्ल्यात एका इमारतीशेजारी आठ फूट उंच संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असताना मातीचा भराव कोसळून बांधकाम करणारे दस्तगीर अब्दुल दिड्डी (वय 44) व त्यांचे जावई मुस्तफा दस्तगीर बल्लोरगी (वय 24, मूळ रा. मलगान, ता. सिंदगी, जि. विजापूर, कर्नाटक) हे दोन कामगार मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेल्याने जागीच ठार झाले. या दुर्घटनेतून एक कामगार सुदैवाने वाचला.

Friday, November 16, 2018 AT 11:52 AM (IST)

चोरट्यांनी मारला दुचाकीसह तीन लाखांच्या ऐवजावर डल्ला 5कराड, दि. 15 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून जवळ असलेल्या मलकापूर-कोयना वसाहतीतील आनंदी विहार अपार्टमेंटमधील तिसर्‍या मजल्यावरील गणेश ज्ञानेश्‍वर कुदळे यांचा फ्लॅट गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास फोडून चोरट्यांनी कपाटातील 9 तोळे दागिने, दोन लॅपटॉप व दुचाकी, असा सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी कपाटातील साहित्य व कपडे विस्कटले होते.

Friday, November 16, 2018 AT 11:50 AM (IST)

15 जण ताब्यात, साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त 5कराड, दि.14 : वारुंजी येथील लक्ष्मीवार्डमधील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पोलीस पथकाने मंगळवारी छापा टाकून 15 जणांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुमारे 5 लाख 52 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना वारुंजी, ता.

Thursday, November 15, 2018 AT 11:21 AM (IST)

  5औंध, दि. 14 : येथील मूळपीठ डोंगराच्या पश्‍चिमेकडील शेरीच्या बाजूला लागलेला वणवा युवकांच्या जागृकतेमुळे आटोक्यात आणण्यात यश आले. अन्यथा आगीची झळ डोंगरावरील शेकडो झाडांना बसली असती. याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी दुपारी साडे बारा ते एकच्या सुमारास मूळपीठ डोंगराच्या पश्‍चिमेकडील बाजूला असणार्‍या शेरी येथील परिसरात वाळके गवत पेटले. आगीचा हा वणवा अचानकपणे वार्‍यामुळे डोंगराच्या दिशेने पसरू लागला होता.

Thursday, November 15, 2018 AT 11:20 AM (IST)

5म्हसवड, दि. 14 : म्हसवड पालिका कार्यालय इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या माउली मोबाईल शॉपीला अचानक आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यात यश आले.   मासाळवाडी येथील विठ्ठल रूपनवर यांचे माउली मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. यामध्ये मोबाईलसह झेरॉक्स, मोबाईल अ‍ॅसेसिरीज विक्री तसेच मोबाईल व संगणक दुरुस्तीची कामे केली जातात.

Thursday, November 15, 2018 AT 11:19 AM (IST)

पीडितेने केला नवजात बालकाचा खून 5फलटण, दि.14 : फलटण तालुक्यातील एका गावात आजोबाने आपल्या अल्पवयीन नातीवर बलात्कार केल्याची घटना घडली. त्यातून नात गर्भवती राहिली आणि तिने बाळाला जन्म दिला. पीडित युवतीने त्या बाळाचा गळा दाबून खून केला. या घटनेने खळबळ उडाली असून ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.

Thursday, November 15, 2018 AT 11:15 AM (IST)

5परळी, दि. 14 : मुंबई येथून सज्जनगडावर आलेल्या एका प्रेमी युगलाने बुधवारी दुपारच्या वेळी गडावरून खोल दरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आत्महत्या करणार्‍या युगुलाचे पूनम मोरे आणि  नीलेश अंकुश मोरे (वय- 26) अशी नावे आहेेत. आत्महत्या करण्यापूर्वी पूनमने तिचा सहा वर्षाचा मुलगा देवराज मोरे याला दगडावर बसवले होते. पाटण तालुक्यातील बोडकेवाडी हे पूनमचे गाव आहे.

Thursday, November 15, 2018 AT 11:13 AM (IST)

5म्हसवड, दि. 13 : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या, लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवड गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरी यांच्या संपूर्ण एक महिना चालणार्‍या शाही विवाह सोहळ्याची धामधूम सध्या सुरू आहे. दिवाळी पाडवा ते तुलसी विवाह या 12 दिवसांच्या दरम्यान परंपरिक पद्धतीने व पूर्वांपार चालत आलेले उभ्या नवरात्राचे अतिशय कडक व्रत सध्या सिद्धनाथ मंदिरात सुरू झाले आहे.

Wednesday, November 14, 2018 AT 11:21 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: